योग आणि त्याचे आरोग्य लाभ याविषयी लोकांमध्ये आता जागरुकता निर्माण झाली आहे. तणाव कमी करण्यापासून ते एकाग्रता वाढवण्यापर्यंत आणि अनेक रोगांचा सामना करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर योग आपल्यासाठी उपयोगी आहे.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, योग उपचार पद्धतीद्वारे पुरुष आणि स्त्री दोघांमधील प्रजनन कार्ये सुधारतात, असे आढळून (Yoga and its health benefits) आले आहे. “प्रजननक्षमतेसाठी योगामुळे तणाव कमी करून स्त्री आणि पुरुष दोघांचेही वंध्यत्व सुधारले जाऊ शकते. ज्यामुळे मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होऊन शरीरातील हार्मोन्सचे संतुलन होते; त्यामुळे जोडप्याची गर्भधारणेची क्षमता वाढते,” असे संशोधनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, तणाव वंध्यत्वाची शक्यता वाढवतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग खूप उपयुक्त आहे.
Conceive India IVF च्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी 11 योगासने उपयुक्त आहेत. त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया.
1. सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कारामध्ये शरीरातील रक्ताभिसरण सुधारणाऱ्या आसनांची मालिकाच आहे. सूर्यनमस्काराचा नियमित सराव स्त्रियांना अनियमित मासिक पाळीसाठी उपयोगी आहे. पुढे बाळंतपणात त्यामुळे त्रास कमी होतो. याशिवाय सूर्यनमस्कारामुळे शरीरातील लैंगिक क्रियाही सुधारतात.
2. हस्तपादासन
स्टँडिंग फॉरवर्ड बेंड म्हणूनही याला ओळखले जाते. हस्तपादासन पाठीच्या आणि पोटातील सर्व स्नायूंना ताण आणते, त्यामुळे शरीरात रक्त परिसंचरण सुधारते. आपले शरीर लवचिक बनवण्यासाठी आणि ओटीपोटाच्या भागातील प्रॉब्लेम कमी करण्यासाठी ही मुद्रा महत्त्वपूर्ण आहे.
3. जानू शिरासन (डोके ते गुडघ्यापर्यंत पोझ)
प्रसूती-स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी रॉय यांच्या मते, हे आसन केवळ महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे नाही तर गर्भधारणेदरम्यान देखील उपयुक्त आहे. जानू शिरासन पोटाच्या स्नायूंना आराम देत शरीराच्या हॅमस्ट्रिंगवर ताण आणते.
4. सेतुबंधासन
सेतुबंधासन किंवा ब्रिज पोझ करणं थोडं कठीण आहे. परिपूर्णतेने आसन करण्यासाठी नियमित सरावाची आवश्यकता असते. ब्रिज पोझ रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते आणि शुक्राणूंच्या संख्येची गतिशीलता देखील वाढवते.
५. सुप्त बद्धकोणासन
याला बटरफ्लाय पोझ असेही संबोधले जाते. या आसनामुळे पिंडऱ्या आणि मांडीचे स्नायू मजबूत होतात. शिवाय, हे मासिक पाळीच्या क्रॅम्प्स, सूज आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.