भारतातील मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.
टाईप 2 मधुमेहामध्ये, इन्सुलिन कमी तयार होते किंवा ते तयार केले तरीही ते योग्यरित्या कार्य करत नाही. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. आणि म्हणूनच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (Controlled) ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, टाइप-1 मधुमेहाच्या बाबतीत, शरीरात इन्सुलिन हा हार्मोन तयार होत नाही. कारण एकदा मधुमेहा झाल्यावर आपले शरीर अनेक रोगांचे घर होऊन बसते. यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य खाण्याच्या सवयी पाळणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दूध (Milk) पिऊ शकता. युनिव्हर्सिटी ऑफ ग्युल्फ आणि टोरंटो विद्यापीठात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी दररोज नाश्त्यामध्ये दूध पिणे फायदेशीर ठरते.
ओट्स
नाश्त्यात ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स सारख्या पदार्थात दूध मिसळून खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. संशोधकांच्या मते, लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला प्रथिनयुक्त पदार्थ नाश्त्यामध्ये खायचे असतील तर दूध हा एक चांगला पर्याय आहे.
जीवनसत्त्वे
दुधामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी शरीरातील पौष्टिक कमतरता भरून काढतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे नक्कीच फायदेशीर आहेत. पण अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दुधात तीन गोष्टी मिसळू शकता. हे रक्तातील साखरेचे प्रमाण सहज नियंत्रित करू शकते.
हिंग
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी दालचिनी आणि हिंग सर्वात फायदेशीर आहे. दालचिनी हा एक असा मसाला आहे ज्यामध्ये हजारो औषधी गुणधर्म आहेत. यातील जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तसेच हिंगमुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते.