टिम लोकप्रवाह, वर्धा दि.५ जून- समाजाचा सर्वांगीण विकास होणेसाठी शासन व प्रशासन स्तरावर संवेदनशील मनाची माणसे असणे महत्त्वाचे आहे, तीच संवेदनशीलता नितेश कराळे यांच्या प्रत्येक उपक्रमातून व त्यांच्या कृतीतून दिसते. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, हे व्यक्तिमत्व आपण जपलं पाहिजे. कराळे मास्तर तयारीला लागाच, आपण मास्तरांना आमदार करूच अशां शब्दात माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भावना व्यक्त केल्या.
फिनिक्स अकॅडमीद्वारा आयोजित यशोत्सव 2023 गुणवंताचा सत्कार समारोह पार पडला. यावेळी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा केला सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, परिविक्षाधीन अधिकारी व नगपरिषद मुख्याधिकारी विनायक महामुनी, युट्युबर प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे व अपेक्षा माथनकर आदिंची उपस्थिती होती. ग्रामीण भागात आजदेखील स्पर्धा परीक्षेबाबत उदासीनता आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती देऊन त्याबद्दल ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन व मार्गदर्शनाची गरज आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढले. यावेळी महामुनी म्हणाले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पूर्णपणे झोकून देत जर आपण अभ्यास केला तर आपला निकाल शंभर टक्के चांगला येतो. प्रास्ताविक सादर करताना कराळे म्हणाले, अनेक मुलं यावर्षी आमच्या अकॅडमीच्या माध्यमातुन नोकरीला लागली आहे. शेवटी मेहनत ही मुलांची आहे, मी फक्त एक आधार दिला. पुढील वर्षीचा निकाल या वर्षापेक्षा नक्कीच जास्त राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एका छोट्याश्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज अनेक मुले प्रशासिकय सेवेत रुजू झाली आहेत त्यामुळे आनंद व अभिमान वाटतो असेही त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल चौधरी व प्रणाली कोमेजवार यांनी तर आभार श्याम शंभरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहित सहारे, वैभव होटे, चेतन गुजरकर, अतुल लेंडे, गोविंद पारिसे, वैभव होटे, सागर चौधरी, शुभम निसार, रोहन आदेवार, क्षितिज कराळे, प्रज्वल गोटे, आर्यन राजूरकर, सुहासिनी हेदाऊ, योगिनी किनकर, तनुजा राऊत, केतकी देवतळे, शेगुन तुमडाम, निखिल ढोकपांडे, प्रिया तुमडाम, तेजस्विनी झाडे, सपना शभरकर, विशाखा तेलतुमडाम, प्रशांत धानोरकर, पुनम जंगले, प्रिया तुमडाम, दीक्षा अडावू व प्रतिक्षा मोहूर्ले यांचे सहकार्य लाभले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...