टिम लोकप्रवाह, चोपडादि. ५ – हल्ली विश्वासावर सर्वसामान्य नागरिक बाहेरील नास्ता करीत असतात. मात्र नास्ता दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा प्रकार शहरात घडलेला आहे. शहरातील पंकज स्टाॕप येथे असलेल्या बिकानेर स्विट मार्ट अँड केटरर्स येथे समोस्यामध्ये चक्क अळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संबंधित दुकानदारावर प्रशासनाद्वारे कडक कारवाई व्हावी असा सुर उमटत आहे.
व्हिडियो बघा…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पवार नगर येथील रहिवासी रविंद्र दाभाडे हे पंकज स्टाॕप स्थित बिकानेर स्विट मार्ट येथे नास्ता करण्यास गेले असता त्यांनी घेतलेल्या समोस्यामध्ये चक्क अळी आढळून आल्याने त्यांनी याचा जाब दुकान मालकास विचारला असता थोडीफार गलती होत असते असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच हलगर्जीपणा करुन सुद्धा चुकी होत राहते असे सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या अशा या मुजोर दुकानदारावर संबंधित प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...