टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, समन्वयक अमन पटेल, अश्विनी खंडेराव पाटील, सुचिता विठ्ठल पाटील तसेच दिपाली नरेंद्र पाटील यांनी विठू माऊली आणि रुखमाईच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. विठू माऊलींच्या गाण्यावर नृत्य करण्यासाठी नृत्य शिक्षिका सौ. दिपाली पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तुकारामांचा अभंग सादर केला. त्यासाठी त्यांना शाळेतील शिक्षक जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी अवधूत ढबू यांनी सुंदर असे भक्तीगीत सादर केले. शाळेतील सर्व विद्यार्थी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी शाळेतून निघाली. जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन दिंडीची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यां मोठ्या उत्साहात विठू रुखमाईच्या नामाचा जय घोष करत मंदिरात पोहोचले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक जगदीश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता न्याती यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.