Sunday, September 6, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, महाराष्ट्र, शैक्षणिक
0
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 : पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे दोन दिवस भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित या समारंभाला पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला पंकज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक गोकुळ भोळे, हेमलता बोरोले व  दिपाली बोरोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली असून त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. पोद्दार मेडिकल कॉलेज, मुंबई येथे कार्यरत व नुकतेच २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले मेडिकल ऑफिसर डॉ. कपिल पाटील, डॉ. नीलिमा चौधरी (असोसिएट प्रोफेसर, पंचकर्म विभाग, आरबी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, आग्रा), निवृत्त आर्मी ऑफिसर संतोष माळी, भरत राठोड, चोपडा नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर मिसर, चोपडा तालुक्याचे पीएसआय सचिन चौधरी, नगरसेवक प्रवीण सदाशिव देशमुख, महावितरण अभियंता संदीप महाजन, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. रुपेश पाटील, भौतिकशास्त्र तज्ञ प्रकाश देशमुख, गोपाल बारेला, शुभांगी पाटील, दीपेश बडगुजर, कविता कोळी तसेच शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या समारंभात शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिके प्रदान करण्यात आली. क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर व ब्राँझ पदकांनी सन्मानित करण्यात आले. समारंभाचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिवप्रेमी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पीएचडी संशोधन करीत असलेले संकेत गांगुर्डे यांनी भरवलेले ऐतिहासिक प्रदर्शन होय. दोन दिवस चाललेल्या प्रदर्शनाला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या काळात पाठ्यपुस्तकांमधील इतिहास कमी होत असताना अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल पालकांनी शाळेचे विशेष कौतुक केले. संकेत गांगुर्डे यांनी देखील विद्यार्थ्यांना व पालकांना शिवचरित्राविषयी प्रेरणादायी माहिती देऊन त्यांना उत्साहित केले.
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना मान्यवर.
प्रमुख पाहुणे डॉ. कपिल पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी जीवनात संघर्षाला घाबरू नये, अपयश स्वीकारून त्यातून शिकत पुढे गेल्यास यश निश्चित मिळते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील व स्वाती शिंदे यांनी केले. तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनी दिव्या महाजन, तनिष्का महाजन, देवयानी चोले, दिशा पाटील, दर्शली पाटील आणि स्वराली चौधरी यांनीही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या समन्वयक उपमा जयस्वाल, शारदा अहिरे, स्वाती सोनवणे व प्रीती पाटील या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post Views: 332
Previous Post

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

Next Post

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

Next Post
आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत - डॉ.संजय पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

वेले-आखतवाडेच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

वेले-आखतवाडेच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

by टीम लोकप्रवाह
August 27, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच ग्रामीण विकासाला शैक्षणिक संस्थेची साथ...

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार !

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 26 : आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात चोपडा शहरातील आदिवासी...

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

चोपड्यात ४२,५६७ रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित

by टीम लोकप्रवाह
August 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us