टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 – शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा शहरातील निवडणूक विभागातील (Sveep) मतदार जनजागृती अभियान अंतर्गत एकूण 3 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. यामध्ये नगरपरिषदेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल, प्रताप विद्या मंदिर व मेमोसा विद्यालय यांचा समावेश होता. यामध्ये प्रताप विद्या मंदिर येथे पिंक बुथच्या संकल्पनेतून आजची आधुनिक स्त्री ही थिम मांडण्यात आली होती. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल येथे प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती व्हावी याकरीता विविध कटआऊट व प्लास्टिक बंदीबाबतचे संदेश देणारे बॅनर व बलुन डेकोरेशन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मेमोसा विद्यालय याठिकाणी स्वच्छ भारत अभियान बाबतची जनजागृती करणारी सजावट करण्यात आली. तसेच मतदारांची सोय, प्रोत्साहन व जागरूकता यांना प्राधान्य देत सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी मतदान केंद्रे यंदा मतदारांचे लक्ष वेधून घेतले. आदर्श मतदान केंद्रात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, व्हीलचेअर व्यवस्था, रॅम्प, सावली निवारा तसेच प्राथमिक मदत कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान करणाऱ्या मतदारास पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. मतदान केंद्र परिसर आकर्षक सजावटीने सुशोभित करण्यात आला असून मतदान-जागृती संदेश, फुलांची सजावट, सेल्फी पॉइंट आदी उपक्रमांमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
Mimosa शाळेतील मतदान केंद्रातील केलेले दृश्य
यावेळी बोलतांना निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी सांगितले की, “मतदारांचा सहभाग वाढवणे, त्यांना सकारात्मक मतदानाचा अनुभव देणे आणि सर्वांसाठी सुलभ व सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आदर्श मतदान केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झंवर यांनी मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने केंद्रावर उपस्थित राहून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सदर उपक्रम निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झंवर व तहसिलदार भाऊसाहेब थोरात आदींच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. याकरीता मतदार जनजागृती अभियान कक्ष यांनी विशेष यांनी परिश्रम घेतले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...