टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 — मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये आज दि.13 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजित करण्यात आले. यात दिवाणी व फौजदारी प्रलंबित 560 प्रकरणापैकी 152 तर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, तहसील कार्यालय, चोपडा नगरपालिका व म. रा. वि. मंडळ आदींच्या दाखलपूर्व 3438 प्रकरणापैकी 49 प्रकरण निकाली झाले. अशाप्रकारे निकाली 201 प्रकारणामधून एकूण 01 कोटी 4 लाख 64 हजार 169 रुपयांची वसुली झाली.
राष्ट्रीय लोक अदालतीत उपस्थित पॅनल प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग
आज चोपडा न्यायालयात सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालतला सुरुवात झाली. यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्यासह पंच म्हणून ॲड. यु. के .पाटील व चोपडा वकील संघाचे सदस्य, सरकारी अभियोक्ता नितीन माळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात व चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील हजर होते.
चोपडा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित 560 प्रकरणे ठेवण्यात आले होते त्यातून फौजदारीचे 77 प्रकरणे, धनादेश अनादर 39 प्रकरणे, पती पत्नीचे कौटुंबीक वादाचे 02 प्रकरणे व दिवाणी 34 प्रकरणे अशी एकूण 152 प्रकरणें निकाली काढण्यात आली. यातून 58 लाख 31 हजार 329 रुपये वसूली झाली. तसेच विविध बँका, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, चोपडा नगरपालिका, तहसील व BSNL यांच्या 3438 इतक्या दाखल पूर्व प्रकरणातून 49 प्रकरणे निकाली निघाली. यामधून तब्बल 46 लाख 32 हजार 840 रुपये वसूल करण्यात आले. असे एकूण 01 कोटी 4 लाख 64 हजार 169 रुपये वसूल करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा नगरपालिका कक्षात उपस्थित मुख्याधिकारी राहुल पाटील, अधिकारी, कर्मचारी व इतर
राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा नगरपालिकेच्या 29 दाखलपूर्व प्रकरणापैकी 13 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तडजोड करीत तब्बल
रु. 37,51,951/- इतकी वसुली करण्यात आली. सदर तडजोड मा.न्यायाधीश एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्या कोर्टात करण्यात आली.याप्रसंगी मुख्याधिकारी राहुल पाटील, उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड, मिळकत व्यवस्थापक संजय ढमाळ, मनोहर माळी, प्रफुल बोन्डे , मुकेश सूर्यवंशी आदी नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह माजी नगरसेवक रमेश शिंदे, कैलास सोनवणे, राजेंद्र पाटील, दिपक महाजन आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, पोलिस कर्मचारी, सहाय्यक अधीक्षक, न्यायालयीन कर्मचारी, विविध बँकेचे शाखाधिकारी व म. रा.वि. मंडळ व बीएसएनएलचे अधिकारी आदींचे सहकार्य लाभले. पॅनल प्रमुख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांचे आभार व्यक्त केले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...