टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १२ जुलै – येथील तालुका व्यापारी महामंडळाची बैठक अनिल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तर संजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. सदर बैठकीमध्ये पुढील तीन वर्षांसाठी सर्व पदांची निवड हि बिनविरोध झाली आहे. यामध्ये अमृतराज सचदेव यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड तर कार्याध्यक्ष म्हणून सुनिल बरडीया यांची निवड बिनविरोध झाली. यासह संपूर्ण कार्यकारिणी पुढील तीन वर्षाकरीता बिनविरोध झाली आहे.
चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची नुतन कार्यकारिणीमध्ये
अध्यक्ष – अमृतराज सचदेव
कार्याध्यक्ष – सुनील बरडिया
प्रमुख मार्गदर्शक – अनिल वानखेडे, संजय कानडे, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, सुनील बुरड, संजय श्रावगी
उपाध्यक्ष – दिपक राखेचा, नरेंद्र तोतला, शाम सोनार, प्रफुल्ल स्वामी, उमेश कासट
कायदेशीर सल्लागार – अॕड. धर्मेंद्र सोनार
सचिव – प्रविण राखेचा
सहसचिव – विपीन जैन
प्रसिद्धी प्रमुख – प्रवीण पाटील, लतीश जैन, मिलिंद सोनवणे तर जवळपास 74 व्यापाऱ्यांची संचालक म्हणून निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अनेक व्यापारी हजर होते नवीन निवड झालेल्या व्यापारी बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी नुतन अध्यक्ष अमृतराज सचदेव म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून सदर जबाबदारी सर्वांच्या सहकार्यामुळे व्यवस्थितरित्या सांभाळत आलो आहे. मात्र या जबाबदारीतुन मुक्त करावे असे सुचविले असतांनासुद्धा पुढील तीन वर्षांसाठी सर्व व्यापारी बांधवांनी दिलेली जवाबदारी समर्थपणे सांभाळेल व व्यापारी बांधवांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सदर व्यापारी महामंडळात सर्व पक्ष, जाती व धर्माचे सभासद असूनदेखील एकोपा व एकमेकांना मदत करण्याची भूमिका असल्यानेच जवळपास २५ वर्षांपासून अध्यक्षपदी विराजमान आहे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले.