Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 14, 2023
in शिक्षण
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १४ जुलै – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सदस्यांचा शपथ ग्रहण समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, चोपडा व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव,  मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल आणि पालक वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी विविध विभागप्रमुख विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यासाठी संगीतशिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. शारदामातेला वंदन करणारे नृत्य इ. ७ वीच्या विद्यर्थिनीनी सादर  केले. त्यासाठी नृत्यशिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांचा प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी मोहित भागवत पाटील आणि मुलींची प्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पूर्वी पवन अग्रवाल यांनी शपथ ग्रहण केली. विविध विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील यावेळी शपथ घेतली. यात खेळ विभागप्रमुख म्हणून अनिकेत साळुंखे व जिनिषा क्षीरसागर, सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून पियुष पाटील व आदिती सिंधी, शिस्त विभागप्रमुख म्हणून देवांशू पाटील व रिद्धीमा सोनवणे, रेड (Red) हाऊस लीडर जयेश पाटील व अंजली पोळ, येलो (yellow) हाऊस लीडर प्रियांषू पाटील व तन्वी पाटील, ग्रीन (Green) हाऊस लीडर मनीष शिरसाठ व मंदाश्री पाटील, ब्लू (Blue) हाऊस लीडर राजवीर पाटील व रोहित मराठे यांनी देखील शपथ घेतली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी मोहित पाटील आणि पूर्वी अग्रवाल यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. अंजली पोळ आणि जीनिषा क्षीरसागर यांना गर्ल्स डबल चॅम्पियनशिप मध्ये प्राप्त केलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. शार्ली महाजन आणि तनिष्क माळी यांना कराटे चॅम्पियनशिप मध्ये यश मिळविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. शाळेचा माजी विद्यार्थी  शब्बीर ख़ुज़म अनीस याने JEE आणि MHT-CET मध्ये प्राप्त उल्लेखनीय यशाबद्दल त्यास सन्मानित करण्यात आले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल, विशाल मराठे, दीप्ती पाटील व पूजा चौधरी यांनी केले तर आभारप्रदर्शन भूषण गुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 371
Previous Post

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या अध्यक्षपदी अमृतराज सचदेव यांची फेरनिवड बिनविरोध

Next Post

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रूग्णालयात विविध कामांचे भुमिपुजन संपन्न

Next Post
आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रूग्णालयात विविध कामांचे भुमिपुजन संपन्न

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रूग्णालयात विविध कामांचे भुमिपुजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us