टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १४ जुलै – येथील उपजिल्हा रूग्णालय येथे दि. १४ रोजी सिटी स्कॅन मशीन व अग्निशामक यंत्रणा बसविणे या कामाचे भुमिपुजन आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर भुमिपुजन पार पडल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेश पाटील यांनी आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे आभार व्यक्त करून रूग्णालयाच्या वतीने स्वागत सत्कार केला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन करीत आपले मनोगत व्यक्त केले.
भुमीपूजनाप्रसंगी उपस्थित आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व इतर मान्यवर
शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे ते आजरी पडल्यावर खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाही. म्हणून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून त्यांना शासकीय रुग्णालयातच सर्व आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे या उद्देशाने आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन मंजूर करून घेतले. तसेच अग्निशामक यंत्रणा सुद्धा मंजूर केली आहे. यामध्ये सिटी स्कॅन मशीनसाठी २ कोटी तर अग्निशामक यंञणेसाठी ८३ लक्ष असे एकूण २ कोटी ८३ लक्ष अंदाजीत रक्कम आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, रावसाहेब पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील, सुकलाल कोळी, प्रताप पाटील, किरण देवराज, मंगला पाटील, कल्पना पाटील, श्रीराम शिरसाठ, अनुराग पाटील, तुषार पाटील, सुनील कोळी, भरत पाटील, सुनंदा पाटील, शितल देवराज, विकास पाटील, दिपक चौधरी, इम्रान खाटिक, प्रवीण देशमुख, गणेश पाटील, कैलास बाविस्कर, किरण पाटील, गोपाळ चौधरी, सुनील पाटील, प्रकाश राजपूत, राजेंद्र जैस्वाल, सुनील बरडीया, संजय शिरसाठ, बिपिन जैन, अनुप जैन, सुनील पाटील, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर शिरसाठ, मंगल इंगळे, नायजाबाई पावरा, अशोक पाटील, बाळु पाटील, बबलु पालीवाल, अशपाक जहागीरदार, दशरथ बाविस्कर, राजू सर संदीप पाटील, मुकेश कोळी, गुलाब कोळी आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
डॉ. स्वप्ना पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. पवन पाटील, डॉ. सागर पाटील, डॉ. चंद्रहास पाटील आदिंसह उपजिल्हा रूग्णालयातील सर्व डाॅक्टर, कर्मचारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...