Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोरीच्या चार दुचाकीसह चोरटे जेरबंद !!

चोपडा शहर पोलीसांची कारवाई

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 30, 2023
in क्राईम, पोलीस डायरी, ब्रेकींग न्युज, महाराष्ट्र
0
चोरीच्या चार दुचाकीसह चोरटे जेरबंद !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २९ जुलै – शहरातील लोहाणा पेट्रोलपंपामागील भागातुन संजय नाना देवरे रा. वडजाई ता.जि. धुळे यांची दिनांक 12/01/2023 रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान एचएफ डिलक्स मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपींना शहर पोलीसांनी अतिशय शिताफीने अटक करुन चोरीच्या चार मोटरसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींमध्ये तिघांचा समावेश असून एक आरोपी हा अल्पवयीन आहे.
चार मोटरसायकली व चोरट्यांसह पोलीस निरिक्षक के.के. पाटील व पथकातील पोलीस कर्मचारी..
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरीलप्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ. शेषराव तोरे यांनी सदर गुन्ह्यात आरोपी 1) पवन संजय साळुंखे, रा. सुंदरगढी चोपडा तसेच 2) अमोल राजेंद्र अहिरे, रा. खडगांव ता.चोपडा यांना अटक करुन व एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल 1) एमएच 18 एएम 8666 एच. एफ डिलक्स मोटार सायकल याव्यतिरीक्त 2) एमएच 19 बीबी 5004 हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल व 3) एमपी 10 एनए 3444 एच एफ डिलक्स व 4) विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची एचएफ डिलक्स मोटार सायकल अशा एकुण चार मोटरसायकली अंदाजे 1,20,000/- रुपये किंमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. सदर चोरीच्या गुन्ह्यात आरोपी क्रं. 1 व 2 यांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 31/07/2023 पावेतो पोलीस कस्टडी मिळाली आहे. सदर आरोपीतांनी याव्यतिरीक्त अजुन गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
http://lokprawah.com/wp-content/uploads/2023/07/VN20230729_212410.mp4
सदर कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सपोनि. अजित सावळे, संतोष चव्हाण, पोउनि. घनशाम तांबे यांच्या नेतृत्वाखाली सफौ. सुनिल पाटील, पोहेकॉ. शेषराव तोरे, विलेश सोनवणे, दिपक विसावे, जितेंद्र सोनवणे, शिवाजी धुमाळ, ज्ञानेश्वर जवागे, प्रदिप राजपुत, पोना. संतोष पारधी, हेमंत कोळी, प्रमोद पाटील, मधुकर पवार, संदिप भोई, किरण गाडीलोहार, ईश्वर धनगर, पोकॉ. मिलींद सपकाळे, प्रकाश मथुरे, रविंद्र पाटील, प्रमोद पवार, विजय बच्छाव, सुमेर वाघरे, शुभम पाटील, आत्माराम अहिरे आदिंच्या पथकाने केली.
Post Views: 2,180
Previous Post

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रूग्णालयात विविध कामांचे भुमिपुजन संपन्न

Next Post

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच केले रक्तदान

Next Post
रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच केले रक्तदान

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द डॉक्टरांनीच केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us