टिम लोकप्रवाह,चोपडा दि. १५ : तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे टोकरे कोळी (एसटी) चे दाखले सुलभ पध्दतीने मिळावीत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी ९ ऑगस्ट पासून प्रांत कार्यालयासमोर शेकडों समाज बांधवांना सोबत घेवून तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, मुक मोर्चा व ठिय्या आंदोलन सुरू केलेले होते. सत्याग्रहाच्या सहाव्या दिवशी चोपडा भाग प्रांताधिकारी एकनाथ बंबाळे यांनी १२ दाखले देण्याचे कबुल करून शनिवारपर्यंत प्रलंबित ८०० पैकी १०० दाखले देणार असल्याचे सांगितले. म्हणून तूर्तास अन्नत्याग सत्याग्रह स्थगित करण्यात आला आहे. मात्र तसे न झाल्यास सोमवारपासून पुन्हा कोळी समाजातर्फे तीव्र लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन व रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असे जगन्नाथ बाविस्कर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, चोसाकाचे माजी चेअरमन घन:शाम पाटिल, व्हाईस चेअरमन शशीकांत देवरे, माजी जिल्हा परीषद सदस्य शांताराम सपकाळे, समाजसेवक लखिचंद बाविस्कर, माजी पंचायत समिती सभापती डि. पी. साळुंके, उपसभापती गोपाळराव सोनवणे, सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक कैलास सोनवणे, सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर, भाजपचे मगन बाविस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटिल, गोरगावलेच्या माजी सरपंच आशाबाई बाविस्कर, व्यापारी महामंडळाचे संचालक वैभवराज बाविस्कर, प्रांताधिकारी एकनाथ बंबाळे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस निरिक्षक कांतिलाल पाटिल, पोहेकाँ. विलेश सोनवणे, आर. एल. बाविस्कसर, भाईदास बाविस्कर, भरतराव पाटिल, बाळु कोळी, प्रेमनाथ बाविस्कर, दिनकर सपकाळे, अनिल कोळी, पंकज रायसिंग, विशालराज बाविस्कर, यांचेसह आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोळी लोकांनी दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील आदिवासी कोळी लोकांनी चोपडा प्रांताधिकारी यांच्याकडे सेतू सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने दाखल्यांसाठीची प्रकरणे सादर करावीत. प्रकरणांसोबत सबळ पुरावे जोडण्यात यावे. याबाबत अधिक माहितीसाठी जेष्ठ मार्गदर्शक लखिचंद बाविस्कर रा. महर्षी वाल्मिकनगर, चोपडा) यांचेशी संपर्क करावा.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...