टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १५ – आपल्या भारत देशातील महान महापुरुषांबाबत असभ्य टीका करणाऱ्या व सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेचा निषेध करुन कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली व त्या आशयाचे निवेदन वर्धा जिल्हा युवक काँग्रेस व देवळी – पुलगाव युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार, देवळी यांना देण्यात आले. सदर निवेदन आमदार तथा माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
यावेळी विराज शिंदे, विपुल ताडाम, अमोल उघडे, निलेश जोत, जय जगताप, राहुल सुरकार, पंकज मोहदुरे, विजय धोपटे, ऋषिकेश डफरे, प्रज्योत भोयर, स्वप्नील कामडी, उमेश जगताप, सचिन ओली, अनिकेत दाते, संकेत इंगोले, हिमांशू ठाकरे आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.