टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १० :- तालुक्यातील शिरसगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. सदर रस्त्याच्या रुंदीकरण करण्यासाठी चक्क रस्त्याच्या बाजुने असणाऱ्या नाल्यातील माती खोदून तिचाच मुरूम म्हणून ठेकेदाराकडून वापर करतांना दिसत आहे. याद्वारे कंत्राटदाराने महसूल विभागाची एकप्रकारे दिशाभूलच केली आहे. त्यापश्चात केलेल्या तक्रारीच्या आधारे स्वतः प्रभारी तहसीलदार यांनी सदर ठिकाणी पाहणी केल्यानंतर सुद्धा त्यांच्या उघड्या डोळ्यांनी मुरूम उत्खनन दिसलें नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
सिरसगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आजगांव ते सिरसगाव डांबरी रस्ता मंजुर असून या रस्त्याचे काम कापसे कंत्राटदार करत आहे. या रस्त्यामध्ये संबधीत ठेकेदार रोड्डच्या साईडचे माती मिश्रित मुरूम तसेच पाठबंधारे विभागच्या कालव्याचा चोरीचा मुरूम वापर करत आहे. करिता संबधीत ठेकेदारवर माती मिश्रित मुरूम तसेच चोरीचा मुरूम वापरल्या प्रकरणी कार्यवाही व्हावी
शुभांगी अमोल उघडे,
सरपंच, सिरसगांव
समाजमाध्यमावर या अवैध मुरूम उत्खनन करतांना अनेक चित्रफिती झाल्यात मात्र तरीही प्रशासनातर्फे हाताची घडी व तोंडावर बोट या उक्तीप्रमाणे काम सुरु आहे. व कंत्राटदाराशी असणाऱ्या आर्थिक हितसंबंधांमुळेच तर याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाकडे स्वतः लक्ष देऊन चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. तसेच मुरूम वाहतुकीबाबत संबंधित ठेकेदार यांच्या कडे कुठलिच परवानगी नसल्याचे कळते. याबाबत महसूल किंवा संबंधित प्रशासनाने सदर कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करुन सदर रस्त्याचे काम गुणवत्तापुर्ण व्हावे अशी मागणी सरपंचासह इतर सदस्य व ग्रामस्थांची आहे.
टिम लोकप्रवाह च्या माध्यमातून या विषयी आमचा पाठपुरावा सुरु राहणार असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही व रस्ते बांधकामाची गुणवत्ता सुधरत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरु राहील.
क्रमशः…