टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २२ : येथील पिपरी मेघे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्वच वार्डात `सुंदर गांव, स्वच्छ गाव” या संकल्पनेतून युवा संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर सामाजिक उपक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत श्रमदानही केले.
यावेळी युवा संघर्ष सामाजिक संघटनेचे सोनू खांडेकर, सुधीर वसु, आनंद धामणकर, गजू भातकुळकर, गजानन वानखेडे, मयूर उईके, आदींसह इतर सदस्य व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.