Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती एमडीव्ही व्हॅनचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 12, 2024
in महाराष्ट्र, वर्धा जिल्हा, शासकीय
0
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती एमडीव्ही व्हॅनचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा, दि.11 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सच्या पारदर्शकतेबाबत, निवडणूक व मतदान प्रक्रिया संबंधाने दृकश्राव्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या मोबाईल डेमो व्हॅनचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल कर्डिले यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला.

एमडीव्ही व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून रवाना करतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व सोबत निवडणुक उपजिल्हाधिकारी अनिल गावीत

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एमडीव्ही व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. निवडणूक उपजिल्हा अधिकारी अनिल गावीत, देवळी विधानसभा मतदारसंघ नोंदणी अधिकारी प्रियांका पवार, वर्धा विधानसभा मतदारसंघ नोंदणी अधिकारी दिपक कारंडे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा वर्धा तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार निवडणूक अतुल रासपायले यांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती.

मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सच्या पारदर्शकतेबाबत जनजागृती करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभाकरिता एकूण आठ एमडीव्ही व्हॅन मतदारांच्या सेवेत सज्ज झाल्या असून त्यावर एलईडीद्वारे दृकश्राव्याच्या माध्यमातून निवडणूक व मतदानसंबंधाने जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स उपलब्ध राहणार आहे. तज्ञांद्वारे मतदारांचे प्रश्नांचे समाधान करण्यात येणार असून ईव्हीएमबाबत संपूर्ण माहिती देणार आहे.

ईव्हिएम व व्हिव्हिपॕट वाहनाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील देवळी, आर्वी, वर्धा व हिंगणघाट या चारही विधानसभा मुख्यालयाच्या ठिकाणी ईव्हीएम डेमो सेंटर सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 6 हजार 10 मतदारांनी प्रत्यक्ष ईव्हीएम मशिन्स हाताळणी करुन या अभियानात भाग घेतला आहे.
गावोगावी येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन नागरिकांनी विशेषत: नवयुवकांनी प्रत्यक्ष मतदान करुन मतदान करण्याची पध्दती समजून घ्यावी व आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व उत्साहात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Post Views: 276
Previous Post

आनंदाची बाब….!! सातपुड्यात वाघोबाचे दर्शन..!!

Next Post

सिरसगांव ते आजगांव डांबरी रस्त्यामध्ये माती मिश्रीत मुरुमाचा वापर

Next Post
सिरसगांव ते आजगांव डांबरी रस्त्यामध्ये माती मिश्रीत मुरुमाचा वापर

सिरसगांव ते आजगांव डांबरी रस्त्यामध्ये माती मिश्रीत मुरुमाचा वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us