टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २२ – राम जन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिरात प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आज दि. २२ रोजी संपन्न झाल्याने चोपडा शहरासह संपुर्ण तालुक्यात राममय असे वातावरण झालेले होते. शहरात सर्वत्र राम नामाचा जप सुरू असून घराघरासमोर सुवासिनींनी रांगोळ्या काढून घराची सजावट केली होती. तर संपूर्ण शहरात आणि गावांमध्ये भगव्या पताकांची आरास लावून, सर्वत्र भगवे झेंडे लावून सर्वत्र राम नामाचा जप सुरू होता. त्यात चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसनेही प्रभु श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची पूजा करून शहरातील मेन रोड मार्गे राम नाम जप करत दिंडी काढली. लहान बालकांनी केलेल्या श्रीराम व लक्ष्मणाच्या वेशाचे आणि एका बालिकेने सीतेच्या वेशभूषेमुळे चोपडा शहराचे लक्ष वेधून घेतले. चोपडा शहरात सर्वप्रथम सकाळी साडेनऊ वाजता काँग्रेसने रामनामाचा जप करत पायी दिंडी काढली.
चोपडा शहरात सर्वत्र श्रीराम – श्रीरामांचा जयघोष आणि राम नाम जप जयघोष सकाळी सहा वाजेपासून ऐकावयास मिळत होता. सर्वत्र रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण ऐकू येत होते. शहर चकाचक झाले असून मंदिरे सजलेले होती. त्यातच चोपडा शहर आणि तालुका काँग्रेस तर्फे ही येथील महात्मा गांधी चौकातील श्रीराम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामाची मनोभावे पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांचे सह तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, माजी शहराध्यक्ष के. डी. चौधरी, सूतगिरणी संचालक देविदास सोनवणे, राजेंद्र पाटील यांचे सह सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेन रोड मार्गे शनी मंदिर वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरात हनुमानाची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बस स्थानकामार्गे पाटीलगढी येथील श्रीराम मंदिरात पूजा करून दिंडीची सांगता करण्यात आली. यावेळी संपूर्ण शहरात राममय असे वातावरण निर्माण झालेले होते. सर्वत्र श्रीराम हेच शब्द कानावर येत होते. काँग्रेस चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या दिंडीत सहभागी झाले होते.
त्यात कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. अनिल पाटील चोसाका संचालक शिवाजी पाटील, गोपाल धनगर, सूतगिरणी संचालक ॲड. एस. डी. पाटील, देविदास सोनवणे, राजेंद्र पाटील, सुनील बागुले, के डी चौधरी, शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील, ए.टी.पाटील, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, आर.डी.साठे, नितिन हिम्मतराव पाटील, डॉ. अशोक कदम, डॉ. प्रसाद पाटील, गोविंदा बापू महाजन, एन. एस यु. आय. प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, अशोक साळुंखे, धनंजय पाटील, सतीश पाटील, प्रा. माया शिंदे, दिलीपराव साळुंखे, मनेश देसले, किरण सोनवणे, सुमित पाटील, विलास दारुंटे, देविदास साळुंखे, नरेंद्र पाटील, रमाकांत सोनवणे, धनजय पाटील, किशोर पाटील, बी. एम. पाटील, संजय सोनवणे, सुनील पाटील, शामकांत पाटील, शैलेश वाघ, समाधान पाटील, व्ही. एच.पाटील, आर. आर. पाटील, नंदू चौधरी, मा. नगरसेवक शुभांगी पाटील, सुवर्णा साळूखें,योगिता चौधरी, अनिता सांगोरे, किर्ती पाटील, स्मिता पोळ, रोहिणी वाघ, सविता जाधव, ललिता साळूखें, मनिषा पाटील, श्रीमती आर. ए. दिवसे, माया पाटील, भाग्यश्री भोसले, डी. एस. पाटील, संदीप पाटील, राहुल साळूखें, भूपेश सोनवणे, कैलास सूर्यवंशी, मयूर पाटील, एस. आर. पाटील, कपिल बाविस्कर, जयेश पाटील, निरुत्ती पाटील, दिपक करंकाळ, अतुल पाटील, सुधाकर बाविस्कर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.