विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या एका शाळेतून एक धक्कादायक कृत्य समोर आलंय. मुलांसमोरच मुख्याध्यापकांनी महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लखीमपूरच्या महांगुखेडा प्राथमिक शाळेतील ही घटना घडली. या व्हिडिओत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षिकेला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. एवढंच काय तर प्रतिउत्तर म्हणून शिक्षिकेनेही मुख्याध्यापकांला मारहाण केल्याचे दिसत आहे. या मारहाणीमागील कारण ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल.
मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य, महिला शिक्षिकेला विद्यार्ध्यांसमोरच केली चपलेने मारहाण pic.twitter.com/jutMnvxX6d
— SakalMedia (@SakalMediaNews) June 25, 2022
शिक्षिका एक दिवसापूर्वी गैरहजर होती, असे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी या शिक्षिकेने रजिस्टरमध्ये स्वत:ला गैरहजर असल्याचे पाहिले त्यानंतर शुक्रवारी ती तक्रार करण्यासाठी मुख्याध्यापकांकडे गेली. शिक्षिकेची तक्रार ऐकून मुख्याध्यापक संतापले आणि त्यांनी मुलांसमोर चक्क शिक्षिकेवर चप्पल काढली. मुख्याध्यापकांच्या या कृतीमुळे शिक्षक संघही संतापलाय आणि या प्रकरणावर जाहीर निषेध व्यक्त करत आहे. मुख्याध्यापक अचानक आक्रमक झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शिक्षिकेने सुद्धा मुख्याध्यापकांना स्वतःच्या चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी वेळीच रोखले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेजारी उभ्या असलेल्या कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.