Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आमदार तानाजी सावंतचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 25, 2022
in राजकीय, महाराष्ट्र
0
आमदार तानाजी सावंतचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले..

पुणे :   आमदार तानाजी सावंत यांच्या  बालाजीनगर परिसरातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले.

त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.शिवसैनिक त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. हाताच शिवसेनेचा झेंडा घेऊन यावेळी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. “गद्दार सावंत” असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांनी यावेळी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी बंडखोरांना इशारा देताना शिवसैनिक आक्रमक झाले तर उद्रेक होईल, आग लागेल असे म्हटले होते. त्याच्या काही वेळातच शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

‘… तर त्या सर्वांची अशीच अवस्था होईल’
जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असेच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले आहेत. सत्ता असताना शिवसेनेत आहे. तो काही मूळ शिवसैनिक नाही, अशी तानाजी सावंत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. हाच कळीचा नारद आहे, त्यामुळे सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.

पुण्यात शिवसैनिक आक्रमक; आमदार तानाजी सावंतांचे ऑफिस फोडले#shivsena #pune pic.twitter.com/R8SV2Oh5GD

— Lokmat (@lokmat) June 25, 2022

संजय राऊत यांनी दिला होता इशारा
बंडखोरी केलेल्या आमदारांनी अजूनही लक्षात ठेवावे. वेळ गेलेली नाही. शिवसैनिक शांत आहे. तो एकदा का आक्रमक झाला, तर आग लागेल, उद्रेक होईल. माझ्याकडे सांगलीचे शिवसैनिक आले होते. ते विचारत होते आम्ही काय करावे? आता हे लोक भडकले तर काय होईल, आग लागेल, असे वक्तव्य सकाळीच संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या काही वेळातच शिवसैनिकांनी पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. तर तिकडे अंबादास दानवे यांनीही इशारा दिला आहे. शिवसैनिक आक्रमक नाही तर काय होणार, असा संताप व्यक्त करत बंडखोरांना परत येण्याचे आवाहन केले आहे. सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.

Post Views: 261
Previous Post

अजबच….चक्क शिक्षिकेला केली चपलेने मारहाण; मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य…!

Next Post

आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा; नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी..!!

Next Post
आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा; नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी..!!

आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा; नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us