टिम लोकप्रवाह, नवी दिल्ली दि.२५ – केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पुरस्कार जाहीर केले जातात. सरकारने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील मान्यवरांना सरकारने सन्मानित केलेलं आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कारांची नावे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. यावर्षी ३४ जणांना सरकारने पद्मश्री देण्याचा निर्णय घेतला आहे.
#PadmaAwards2024 | Parbati Baruah, India's first female elephant mahout who started taming the wild tuskers at the age of 14 to overcome stereotypes, to receive Padma Shri in the field of Social Work (Animal Welfare). pic.twitter.com/Zt7YW3fNVe
— ANI (@ANI) January 25, 2024
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चामी मुर्मू, गुरविंदर सिंग, सत्यनारायण बेलारी, दुखु माझी, के. चेलम्माल, संगथनकिमा, हिमचंद मांझी, यनुंग जेमो, सोमन्ना, सर्वेश्वर बी., प्रेमा धनराज, उदय देशपांडे, वाय. इटालिया, शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, रतन कहर, अशोक कुमार बी., बाळकृष्ण वेल्ली, उमा माहेश्वरी, गोपीनाथ एस., स्मृती रेखा चक्मा,ओमप्रकाश शर्मा, नारायण ईपी, भागवत प्रधान, एस.आर. पाल, बद्रापन एम., जॉर्डन लेप्चा, एम. सासा, जानकीलाल, डी. कोंडप्पा, बाबू राम यादव, नेपाल चंद्रा
पार्वती बरुआ ह्या भारतातील पहिल्या महिला हत्ती माहुत आहेत. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच झारखंडमधील जशपूर जिल्ह्यातील आदिवासी कल्याण कार्यकर्ता जागेश्वर यादव यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारत सरकारने 1954 मध्ये पद्म पुरस्काराची सुरुवात केली. 1955 मध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशी वर्गवारी करुन पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.