टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ : चोपडा तालुक्यातील अडावद येथे चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक सेवा ट्रस्ट प्रायोजित तसेच बालाजी गणेश मंडळ आणि अडावद क्रीडा प्रेमी आयोजित कबड्डी चषक स्पर्धेचे ३ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल ३२ संघांचा सहभाग राहणार असून विजेता कोण होणार? ही उत्सुकता लागुन राहणार आहे. अडावद येथील शनि मंदिरामागील क्रीडागणांवर शनिवारी सकाळी ९ वाजेपासून या कबड्डी चषक स्पर्धेला सुरुवात होईल.
सदर कबड्डी स्पर्धेत ठाणे, अकोला, शेगांव व मध्यप्रदेशातून सुद्धा तेथील संघ सहभागी होण्याकरीता येणार आहेत. कबड्डी स्पर्धेतील पहिल्या तीन संघाना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच बेस्ट रेडर आणि बेस्ट रिफेंडरला ट्रॉफी, पहिल्या चार संघांना मेडल त्याचप्रमाणे सर्व सहभागी संघातील खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार असून बक्षिस वितरण मा. विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नरेंद्र पाटील, श्रीकांत दहाड, दर्शन राजपूत, विरेंद्र बैरागी, लोकेश महाजन, यश महाजन, हितेश मिस्तरी, सचिन तडवी यांच्याशी संपर्क साधावा. अडावद कबड्डी चषक – स्पर्धेत अधिकाधिक संघानी सहभाग घेण्याचे आवाहन – चोपडा पीपल्स बँक सेवा ट्रस्ट तसेच बालाजी गणेश – मंडळ आणि अडावदच्या क्रीडाप्रेमींनी केले आहे.
Bot Badiya he