टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ – येथील ग्राहक पंचायत शाखा- चोपडा ची मासिक मिटींग सोमवार दिनांक २९ रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा शाखेचे अध्यक्ष राजु गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री, चोपडा तालुका सचिव भुपेंद्र गुजराथी, प्रमोद डोंगरे, उपाध्यक्ष महेश पोतदार, डाॅ. पृथ्वीराज सैंदाणें, कैलास महाजन, अनिल बारी, विजय पाटील, सुधाकर पाटील आदिंची उपस्थिती होती.
सदर सभेत सार्वजनिक प्रश्नांनवरती चर्चा करण्यात आली. ग्राहकांची फसवणूक व अन्याय होत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे याप्रसंगी सुचविण्यात आले. तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा सुरु कराव्यात अशा सुचना जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री यांनी केली. यावेळी सर्व ठराव हे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन भुपेंद्र गुजराथी यांनी केले.