टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ – देशाचे नेते खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी व महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्नासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार लढत आहे. परंतु विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी राज्य सरकारने आमदार रोहित पवार यांचेवर ईडीची कारवाई करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
केंद्र व राज्य सरकार विरोधी पक्षाचे नेते आणि
आजी – माजी आमदार व खासदार यांच्यावर खोट्या कारवाया करून नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत असून, सरकारने सुडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे नायब तहसीलदार सचिन बांबळे, अव्वल कारकून आर.आर.महाजन यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विमा नाकारून पीक विमा कंपन्यांनी अन्याय केला असून सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामांवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतीमालाच्या उत्पन्नात मोठी घट आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मुग पिकांना त्वरीत पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी चोसाकाचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, संचालक शशिकांत देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक चव्हाण, सूतगिरणीचे व्हॉईसचेअरमन प्रल्हाद पाटील, संचालक अमृतराव वाघ, कैलास बाविस्कर, माजी संचालक तुकाराम पाटील, भालेराव पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद जैन, पंचायत समितीचे माजी सभापती प्रा.भरत पाटील, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, युवकचे शहराध्यक्ष समाधान माळी, राष्ट्रवादीचे ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष किशोर दुसाने, सामाजिक न्याय विभागाचे चोपडा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब साळुंखे, जिल्हा सरचिटणीस दीपक वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बाविस्कर, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पाटील, प्रफुल स्वामी, राकेश पाटील, अमोल राजपूत, रणजित देशमुख, सागर पाटील, जितेंद्र मराठे, छोटू विसावे यांचेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 205