टिम लोकप्रवाह, वर्धा, दि.2 (जिमाका) : सुधारित वाळू धोरणानुसार 2023-24 या व्दितीय वर्षासाठी वाळू डेपो सुरू करण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील डेपो क्र. 5 मौजा सावंगी (रिठ) येथे 100 ब्रास साठा, डेपो क्र. 6 मौजा येळी येथे 1 हजार 289.66 ब्रास व वर्धा तालुक्यातील डेपो क्र. 7 मौजा आलोडी येथे 70 ब्रास वाळू साठा उपलब्ध आहे.
वाळू खरेदीसाठी जिल्ह्यातील नागरिकांना महाऑनलाईन (सीएससी व सेतू) केंद्रातून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाखनिज या संकेतस्थळावर वाळूची नोंदणी करता येईल. नागरिकांनी 133 रुपये प्रती मेट्रीक टन आणि त्यावर 10 टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी या दराने वाळू खरेदी करता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.