टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २ – नागपूर ते पूणे जाणाऱ्या प्रवाश्यांना घेवून प्रवास करणारी पूजा ट्रॅव्हल्स या लक्झरी बसला कारंजा लाड जवळ समृद्धी महामार्गावर दि. ०१ फेब्रुवारी रोजी रात्री 12.00 वाजेदरम्यान नीलगाय महामार्गावर पुढे आल्यामुळे ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे बसची ट्रकला जोरात धडक झाली, सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
या अपघातात लक्झरी बसमधील तब्बल १७ प्रवाशी जखमी झाले असून त्यामध्ये भंडारा, नागपूर, वर्धा येथील प्रवाशी होते. वर्धातील ४ही प्रवासी हे स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कर्मचारी असून ते गोवा येथे बँकेमार्फत असणाऱ्या प्रशिक्षण शिबीराकरीता जात होते. कुश मिश्रा, मच्छिंद्र बाभुटकर, मोनिका झोरे व प्रतीक्षा नासरे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना प्राथमिक उपचाराकरीता कारंजा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. व तदनंतर जखमींना सेवाग्राम रुग्णालय वर्धा येथे पुढील उपचाराकरीता हलविण्यात आहे.