लोकप्रवाह, चोपडा दि. २८ जून – येथील चोपडा कसबे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल ४६ वर्षांनंतर प्रथमच बिनविरोध पार पडली आहे. विद्यमान सहकार पॅनलचे चेअरमन प्रवीण गुजराथी यांच्या रणनितीने पॅनलने संपुर्ण १३ जागांवर आपला झेंडा रोवला आहे.
या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सहकार पॅनलचे सर्वसाधारण मतदार संघ प्रवीण विठ्ठलदास गुजराथी, गोपाळ भनकू चौधरी, श्रीकांत शांताराम नेवे, संदीप गोकूळ धारपवार, डॅा.सुभाष प्रभाकर देसाई, भास्कर नामदेव पाटील, प्रवीण मुरलीधर देशमुख, दत्तु धाकू मराठे, अनुसूचीत जाती जमाती राखीव – नारायण सुका बाविस्कर, भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव – उखा बंडू धनगर, इतर मागासवर्ग राखीव – युवराज दगडू महाजन, महिला राखीव – विमलबाई राजेंद्र देशमुख, सिंधूबाई गोविंद पाटील आदि उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणूकीसाठी सोसायटीचे एकुण १०९२ मतदार पात्र होते. तेरा जागांसाठी १९ जणांनी २१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या निवडणूकीतून अशोक पाटील, भरत पाटील, मुश्ताक जहागिरदार, रमेश शिंदे, मंगलाबाई माळी, अमोल शिंदे यांनी माघार घेतली. निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून माजी आ.कैलाद पाटील, डॅा.महेंद्र पाटील, दिलीपराव पाटील, अनिल वानखेडे, संजय कानडे, अमृतराज सचदेव, राजू शर्मा, पप्पू सोनार, हाजी हनिफ मिस्तरी, डॅा.रवींद्र पाटील, प्रभाकर बडगुजर, महेंद्र शिरसाठ, विलास माळी, पुंडलिक महाजन यांनी सहकार्य केले.
या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी आय.बी.तडवी यांनी काम पाहिले. तर त्यांना सहाय्यक म्हणून सोसायटीचे सचिव मनोहर शिरसाठ यांनी सहकार्य केले.
सभासदांच्या विश्वासला तडा न जावू देता. संस्थेत सचोटीने, पारदर्शक कारभाराची परंपरा चालविणार
-चेअरमन प्रविण गुजराथी-
सभासदांच्या विश्वासामुळेच बिनविरोध – प्रवीण गुजराथी
संस्थेचे माजी चेअरमन स्व.विठ्ठलदास छगनलाल गुजराथी यांनी १९७६ साली चोपडा कसबे सोसायटी डबघाईला आल्यानंतर आपल्या अधिपत्याखाली आणली. सुमारे ३५ वर्षे ते चेअरमन राहिले. त्यांच्या नेतृत्वात सोसायटी भरभराटीला आली. भाड्याच्या खोलीतून स्वतःच्या टोलेजंग इमारतीत आली. सभासद हिताचे सातत्याने निर्णय घेतले जात असल्याने आमच्या पॅनलने विश्वास कमविला. त्यामुळेच आज सोसायटीची आज निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्याचा आम्हांला आनंद आहे.
Post Views: 257