Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा रोटरी क्लबतर्फे आरोग्य शिबीर; जवळपास ४00 जणांनी घेतला शिबीराचा लाभ…!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 26, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
चोपडा रोटरी क्लबतर्फे आरोग्य शिबीर; जवळपास ४00 जणांनी घेतला शिबीराचा लाभ…!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २५ जून – तालुक्यातील बिडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात चोपडा रोटरी क्लबतर्फे आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर हे होते. सदर शिबीरात बिडगाव परिसरातील मोहरद, कुंड्यापाणी, चांदण्या तलाव या गावांसह इतर दहा आदिवासी गावातील ४०० जणांनी लाभ घेतला.
यावेळी आरोग्य तपासणी करीत मोफत औषधीचे वाटपसुद्धा करण्यात आले.
शिबीर उद्घाटनाप्रसंगी डॉ. प्रदिप लासूरकर, सरपंच विजया पाटील व चोपडा रोटरी अध्यक्ष पंकज बोरोले व इतर
या शिबीरामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. पराग पाटील, डॉ.नीता जैस्वाल, डॉ.अमोल पाटील, बालरोग तज्ञ डॉ. प्रफुल्ल पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ.सचिन कोल्हे, हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण सोनवणे यांच्यासह धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. उमेश कवडीवाले, बिडगांव आरोग्य उपकेंद्राचे डॉ. वसीम खान, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा वर्कर यांनी सहकार्य केले. आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधांची कमी असते. आदिवासी भाग असलेल्या बिडगांव येथे चोपडा रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेने  आरोग्य शिबीरासोबतच मोफत औषधी वाटप तसेच मोफत रक्ततपासणी करून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांनी सांगितले. सदर  आरोग्य शिबीर व मोफत औषधींचे वाटप कार्यक्रमास बिडगांवच्या सरपंच विजया पाटील, पोलीस पाटील रामकृष्ण पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.
http://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/InShot_20220622_010718463_compress_1.mp4
यावेळी चोपडा रोटरीचे अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव प्रवीण मिस्त्री, प्रोजेक्ट चेअरमन संजीव गुजराथी,  को-चेअरमन डॉ. पराग पाटील व नयन महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तसेच नितीन अहिरराव, रुपेश पाटील, चेतन टाटिया, अर्पित अग्रवाल, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील,  चंद्रशेखर साखरे, नितीन जैन, धिरज अग्रवाल, दिलीप जैन, भालचंद्र पवार, पृथ्वीराज राजपूत आदी रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.
Post Views: 352
Previous Post

सत्रासेन आश्रमशाळा येथे  व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन       

Next Post

तब्बल ४६ वर्षांनंतर चोपडा कसबे सोसायटी बिनविरोध; चेअरमन प्रवीण गुजराथींच्या प्रयत्नांनी सहकार पॅनलला मोठे यश…!

Next Post
तब्बल ४६ वर्षांनंतर चोपडा कसबे सोसायटी बिनविरोध; चेअरमन प्रवीण गुजराथींच्या प्रयत्नांनी सहकार पॅनलला मोठे यश…!

तब्बल ४६ वर्षांनंतर चोपडा कसबे सोसायटी बिनविरोध; चेअरमन प्रवीण गुजराथींच्या प्रयत्नांनी सहकार पॅनलला मोठे यश...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us