टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १७ – चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्सवांतर्गत शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवचरित्राचे अभ्यासक व प्रचारक ह. भ. प. संजीव सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील विविध प्रसंग आपल्या ओघावत्या वाणीतून जसेच्या तसे विद्यार्थ्यांसमोर उभे केले. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाचे सुंदर शब्दचित्रण केले. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक या प्रसंगातून प्रेरित झाले. शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले ध्येय निश्चित करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी व्याख्याते ह. भ. प. संजीव सोनवणे यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. चौधरी यांनी केले. यावेळी मंचावर चहार्डी गटाचे केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, जिल्ह परिषद शाळा वेले येथील मुख्याध्यापक बापू बहारे, पर्यवेक्षक व्ही. ए. नागपुरे, आर. एम. चौधरी, एस. पी. बिऱ्हाडे, पी. ए. बाविस्कर, प्रकाश पाटील, जयेश सनेर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. बी. मोतीराळे यांनी केले तर आभार एस. पी. बिऱ्हाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.