Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात अवयवदान जनप्रबोधन रॅलीनिमित्त व्याख्यान संपन्न 

रोटरी क्लब आॕफ चोपडा व डॉ. सुरेशदादा पाटील नर्सिंग कॉलेज यांचे तर्फे संयुक्तपणे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 15, 2024
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
चोपड्यात अवयवदान जनप्रबोधन रॅलीनिमित्त व्याख्यान संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १५ – दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई व संयोजक रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, नाशिक यांची खान्देश अवयव दान जनप्रबोधन यात्रेचे नुकतेच चोपडा येथे आगमन झाले होते. यावेळी शहरात अवयवदान जनप्रबोधन प्रभातफेरी तसेच बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व गांधी चौक या ठिकाणी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत घोषणा देत जनजागृती केली. यानंतर एम. जी. कॉलेज येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे अवयवदान जनप्रबोधन हेतूने विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा घेण्यात आली, त्यात अत्यंत सुंदर, कल्पक व अभ्यासपूर्ण पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तद्नंतर सभागृहात  अवयवदान जनप्रबोधन यात्रेचे व्याख्याते प्रशांत पागनिस व सुधीर बागाईतदार यांनी उपस्थितांना त्वचादान, नेत्रदान, अवयवदान व देहदान यासंदर्भात माहिती दिली. तसेच अवयवदान, नेत्रदान व अंगदान याबाबतच्या गैरसमजूती, त्यांची आवश्यकता व महत्त्व उदाहरणासह पटवून दिले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख रोटे. रुपेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्या करुणा चंदनशिव यांनी तर आभारप्रदर्शन प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हनुमंत सदाफुले यांनी केले. यावेळी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँण्ड बॉडी डोनेशन, मुंबई संस्थेचे अविनाश कुळकर्णी, नागराजन अय्यर, सुधीर व माधुरी बागाईतदार, चंद्रशेखर देशपांडे, अशोक जव्हेरी यांच्यासह  रोटरी चोपडा प्रेसिडेंट रोटे. चेतन टाटीया, सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, ज्येष्ठ रोटे एम. डब्ल्यू. पाटील, रोटे. व्ही . एस.पाटील, रोटे. विलास पाटील, रोटे. पंकज बोरोले, रोटे. ईश्वर सौंदाणकर, रोटे. पवन गुजराथी, रोटे. विपुल छाजेड, रोटे. अरुण सपकाळे, रोटे. बी. एस. पवार आदिंसह इतर रोटरी सदस्य तसेच दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील नर्सिंग कॉलेज व प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक वृंदांची उपस्थिती व सहकार्य लाभले.
Post Views: 390
Previous Post

राष्ट्रवादी सोशल मिडीया मेळाव्यासाठी पदाधिकारी मुंबईला रवाना

Next Post

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित करावे – ह. भ. प. संजीवजी सोनवणे

Next Post
शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित करावे – ह. भ. प. संजीवजी सोनवणे

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित करावे - ह. भ. प. संजीवजी सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us