Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अधिवेशन काळात कोळी जमातीचे आझाद मैदानावर पुन्हा ठिय्या आंदोलन.

राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचे उपस्थितीचे आवाहन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 22, 2024
in ब्रेकींग न्युज, महाराष्ट्र
0
अधिवेशन काळात कोळी जमातीचे आझाद मैदानावर पुन्हा ठिय्या आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २२ : आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक न्याय हक्क व अधिकारांसाठी २३ जानेवारीपासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच १५ फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक निमंत्रक अॕड. शरदचंद्र जाधव पुणे, प्रभारी अध्यक्ष आयोजक सखाराम बिऱ्हाडे संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाने व अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी महाआंदोलन उपोषण सुरू होते. परंतु याकडे बेजबाबदार शासन, प्रशासन व राजकारण्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे आदिवासी कोळी जमातीतर्फे ह्यांचा तिव्र धिक्कार व निषेध करून आंदोलन उपोषण तुर्त स्थगित करण्यात आलेले होते. परंतु येत्या काळात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने पुन्हा आझाद मैदानावर २९ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान तीव्र ठिय्या आंदोलन उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

जर या काळातही मुख्यमंत्री व संबंधित विभागाने सुयोग्य निर्णय घेऊन तोडगा काढला नाही तर पुढील काळात राज्यातील कोळी समाज सत्ताधारी व विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने पिवळ्या झेंड्याखाली कोळी समाजाच्या पक्षाशी संबंधित उमेदवारांना विधिमंडळात पाठवण्यात येईल. तरच आपला प्रश्न सुटू शकेल. यासाठी २९ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

 

Post Views: 516
Previous Post

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनाचे ध्येय निश्चित करावे – ह. भ. प. संजीवजी सोनवणे

Next Post

लासूर येथे सामाजिक दायित्वातून शाळेस इंव्हर्टर व टिव्हि संच भेट

Next Post
लासूर येथे सामाजिक दायित्वातून शाळेस इंव्हर्टर व टिव्हि संच भेट

लासूर येथे सामाजिक दायित्वातून शाळेस इंव्हर्टर व टिव्हि संच भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us