टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २७ – तालुक्यात दिनांक २६ रोजी झालेल्या अवकाळी गारपीट व पावसाने तालुक्यातील निंमगव्हाण, चुंचाळे, मामलदे, दोंदवाडे, तांदळवाडी, चहार्डी, काजीपुरा, हातेड, संपुले आदि गांवासह तालुक्यातील इतर भागात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. शेतकरी वर्गाचे हाताशी आलेल्या दादर, मका, हरभरा, बाजरी, गहू आदि पिकांचे अतोनात नुकसान झाले. सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन नायब तहसीलदार महाजन यांनी स्विकारले.
सदर निवेदनावर जेडीसीसी बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कृउबा माजी सभापती नारायण पाटील, चोपडा कसबे सोसायटी चेअरमन प्रविण गुजराथी, रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, परेश देशमुख, चोपडा सुतगिरणी संचालक विनोद पाटील, रविंद्र चौधरी, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर, कार्याध्यक्ष माया महाजन, उपाध्यक्ष जयश्री पाटील, रवींद्र धनगर, मिलिंद सोनवणे, गोपाल दाभाडे, सनी सचदेव, शुभम सोनवणे आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.