टिम लोकप्रवाह,चोपडा दि. ०३– येथील चोपडा पीपल्स को – ऑप बँक, सार्वजनिक सेवा ट्रस्ट, चोपडा व एस.एन.आर.जी. इंग्लिश मेडीयम स्कुल, घोडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घोडगाव ते कुसुंबे मॅरेथॉन स्पर्धेचे अनेर परिसरातील इयत्ता ३री ते ५वी च्या विद्यार्थ्यांसाठी आज रोजी आयोजन करण्यात आले. यात परिसरातील जिल्हा परिषद शाळा गलंगी, वेळोदे, घोडगाव, वाळकी, अनवर्दे, विटनेर येथील विद्यार्थ्यांनी तर घोडगाव हायस्कुल, एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुल, गलंगी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ घोडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे प्रतिमापूजन व परिसरातील लहान बालकांना पोलिओ डोस दिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी गावातील पालक व नागरिकांनी उभे राहून स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा, वाळकी चा विद्यार्थी समाधान राजेंद्र भिल, व्दितीय क्रमांक सी. बी. निकुंभ हायस्कुल घोडगाव शाळेचा मितेंद्र अंतीलाल बारेला तर तृतीय क्रमांक जि. प. शाळा वाळकी चा विद्यार्थी आदित्य गोविंदा धिवर यांनी पटकाविला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक एस. एन. आर. जी. इंग्लिश स्कुल घोडगाव चा विद्यार्थी अर्जुन रघुनाथ पावरा याने पटकाविले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी तालुक्यातील गणपूर येथील स्वप्निल ज्ञानेश्वर पाटील यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, घोडगावच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वप्नील पाटील यांनी मुलांना अशाच छोट्या छोट्या स्पर्धामध्ये भाग घेऊन स्वतःला तयार करण्यासाठीचा संदेश दिला.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी मुलांमधील गुण ओळखण्यासाठी अशा स्पर्धाचे आयोजन करावे, असे सांगितले.
यावेळी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन, सार्वजनिक सेवा ट्रस्ट व नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य व चोपडा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, नूतन शिक्षण प्रसारक मंडळ चे उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, संचालक मदन पाटील, निंबा पाटील, रमेश पाटील, खंडेराव सोनवणे, चोपडा पीपल्स बँक व सार्वजनिक सेवा ट्रस्टचे संचालक प्रा. आशिष गुजराथी, सुनिल गुजराथी, विनोद पाटील घोडगाव, सतिष पाटील, मणिलाल पाटील कुसुंबे, अरुण सोनवणे वेळोदे, अतुल पाटील, हातेड आरोग्य केंद्राचे डॉ. विवेक जैस्वाल, विकास शिर्के, सी. बी. निकुंभ हायस्कुलचे पर्यवेक्षक वसंत नागपुरे, एस. एन. आर. जी. स्कुलच्या प्राचार्या जेनीफर साळुंके, कल्पेश साळुंके, एस. एन. आर. जी. आय. टी. आय. चे प्रसाद बाविस्कर आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी घोडगाव व कुसुंबे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 332