टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. 7 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन वर्धा विभागाच्यावतीने श्री. क्षेत्र सालबर्डी, ढगा, पोहणा, कोटेश्वर, टाकरखेडा येथे महाशिवरात्री निमित्त प्रवास करणा-या भाविकांसाठी जिल्ह्यातील आगारातून दि.13 मार्च पर्यंत जादा यात्रा स्पेशल आगार निहाय बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या जादा बसेसचा प्रवासासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सालबर्डी करीता दि.11 मार्च पर्यंत वर्धा आगारातून 18 बस, आर्वी आगारातून 24 बस, हिंगणघाट 10 बस, तळेगाव 28 बस, पुलगाव 25 बस अशा एकुण 105 बस सुरु करण्यात आल्या आहे. ढगा करीता दि.9 मार्च पर्यंत वर्धा आगारातून 65 बस, आर्वी 7, हिंगणघाट 7 बस, तळेगाव 4 बस, पुलगाव 4 बस पोहणा करीता दि.13 मार्च पर्यंत हिंगणघाट येथून 39 बस टाकरखेडा करीता दि. 8 मार्च पर्यंत आर्वी येथून 6 बस, व कोटेश्वर करीता दि.9 मार्च पर्यंत पुलगाव येथून 4 जादा बस सुरु करण्यात आल्या आहे. तसेच गावकरी, समुह, वारकरी समुह, भजन मंडळ, मंदिर समिती यासारख्या समुहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी तसेच जेष्ठ नागरिकांना देय असलेल्या तिकिटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्यासाठी आगार प्रमुख बसस्थानक प्रमुख तसेच बसस्थानकांवरील उपस्थित पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा, असे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.