Thursday, June 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वर्धा जिल्हा परिषदेचा सन २०२४ – २०२५ चा अर्थ संकल्प सादर

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केला अर्थसंकल्प सादर

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 8, 2024
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
वर्धा जिल्हा परिषदेचा सन २०२४ – २०२५ चा अर्थ संकल्प सादर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ८ – मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी सादर केला. संबंधित अर्थसंकल्प ना तोट्याचा ना शिलकीचाच आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर उंचावण्यासाठी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जमे ऐवढाच खर्चाचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. सन 2024-25 चा मुळ अर्थसंकल्प हा 27 कोटी 30 लाख 68 हजार 726 रुपयांचा आहे.

वर्धा जिल्हा परिषदेला प्राप्त होणा-या व्याजावरील रक्कमा बाबत मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अल्पमुदत व दिर्घमुदतीचे गुंतवणुक धोरणामुळे व्याजाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर उंचविण्यासाठी उपाययोजना या नवीन योजनेंतर्गत 30 लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांचे क्रिडा व कलागुण जोपासण्यासाठी विविध स्तरावर प्रोत्साहनपर स्पर्धा आयोजित करण्यासाठी 12 लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेच्या माध्यमातून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

• प्राथमिक शिक्षण
शिक्षकदिनी शिक्षक गौरव करण्यासाठी 1 लाख
विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर उंचविण्यासाठी उपाययोजना 30 लाख, विद्यार्थ्यांचे क्रिडा व कलागुण जोपासण्यासाठी स्पर्धा आयोजनासाठी 12 लाख

• सार्वजनिक आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साथरोग व इतर जिवनावश्यक औषधी खरेदीसाठी 16 लाख
प्रसुती व बाल कल्याण केंद्रासाठी औषध खरेदीसाठी 15 लाख, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी 1 लाख
अॕलोपॅथी दवाखाने, मंडी आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखान्यास औषधी पुरवठा 16 लाख

 

• पाणी पुरवठा व स्वच्छता
प्रादेशिक पाणी पुरवठा अंतर्गत संयुक्त नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 3 कोटी
इतर नळ पाणी पुरवठा योजनांची देखभाल-दुरुस्ती 10.00 लाख, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याचे मिटर बसविणे 10 लाख, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याचे देयकाची वसुलीसाठी 2 लाख

 

• सामाजिक सुरक्षा व कल्याण
मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिरात पुस्तके पुरविणे 5.50 लाख, जि.प. शाळेतील मागासवर्गीय विदयार्थ्यांना सायकल पुरविणे 7 लाख, ओलीतासाठी जवाहर दशलक्ष विहीरीवर डिझेल/ विद्युत पंप 100 टक्के अनुदानावर पुरविणे 10 लाख, मागासवर्गीय शेतकऱ्यांना अवजारे पुरविणे 20 लाख, मागासवर्गीय महिलांना व पुरुषांना स्वयंरोजगारासाठी पिकोफॉल/शेवई/शिलाई मशीन पुरविणे 20 लाख, मागासवर्गीय भजनी मंडळांना भजनी साहित्य पुरविणे 5 लाख
मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर काटेरी तार पुरविणे 10 लाख, मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, उद्याने/ बगीचे/ समाज मंदिराकरिता 25 लाख, स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय बचतगटांना उदयोग व उपजिविका साहित्य पुरविणे 50 लाख, मागासवर्गीय बचत गटांसाठी शेती अवजार बॅंक तयार करणे 30 लाख

 

• दिव्यांग कल्याण
दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे 40 लाख, दिव्यांगांच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करणे 2 लाख, दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साधन व तंत्रज्ञान साहित्य पुरविणे 30 लाख, जि.प. शाळेतील सीडब्ल्यूएसएन विदयाथ्यांना साहित्य पुरविणे 20 लाख
सुगम्य भारत योजना 15 लाख

 

* महिला व बालकल्याण
महिलांसाठी समुपदेशन केंद्र 3 लाख
महिलांचे मेळावे आयोजित करणे 9 लाख
अंगणवाडयांसाठी साहित्य व सुविधा पुरविणे 68.40 लाख, ग्रामिण भागातील महिलांसाठी वैयक्तीक लाभाच्या योजनांतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना 90 टक्के अनुदानावर शिवणयंत्र पुरविणे 15 लाख, मुलींना व महिलांना व्यावसायीक प्रशिक्षण देणे 9 लाख, सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण देणे 20 लाख, आयसीडीएस गटातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविका/मदतनिसांना पुरस्कार 2 लाख, पाचवी ते बारावीच्या मुलीना सायकल पुरविणे 15 लाख, मुलींना स्वरक्षणासाठी/ शारिरीक विकासासाठी जिवन कौशल्य प्रशिक्षण योजना 2 लाख, सशक्त महिला व कुपोषणमुक्त मुले करिता 45 लाख

 

• कृषी कार्यक्रम
शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सिंचनासाठी पी.व्ही.सी./एच.डी.पी.ई. पाईपचा पुरवठा करणे 18 लाख, शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सिंचनपंप पुरविणे 20 लाख, शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर सुधारीत अवजारे/उपकरणे/काटेरी तार पुरविणे 15 लाख, शेतकरी सहकार्य सहाय्य अंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त पात्र कुटुंबियांना आर्थिक सहाय्य योजना 30 लाख

पशुसंवर्धन
वांझ जनावरांसाठी औषध पुरवठा करणे 9 लाख, गौळाऊ जातीच्या जनावरांचा विकास करणे 5 लाख, गोचिड निर्मूलनार्थ औषधांचा पुरवठा 4 लाख, जनावरांच्या तातडीच्या उपचारासाठी औषधी/संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लस पुरवठा करणे 7.50 लाख, जि.प. अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषध पुरवठा करणे 25 लाख, 75 टक्के अनुदानावर सुधारीत जातीचे शेळीगट वाटप करणे 27 लाख, पशुसंवर्धन दिन अंतर्गत उत्कृष्ट पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, प्रगतीशिल पशुपालक यांना पुरस्कार 50 लाख

 

• लघुपाटबंधारे
कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती 20 लाख
लहान पाटबंधाऱ्याची देखभाल-दुरुस्ती 4 लाख
• ग्रामिण विदयुतीकरण
ग्रामिण भागात विद्युत खांब उभारणे 20 लाख

 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, डॉ. ज्ञानदा फणसे, सुनिल मेसरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी सूरज बारापात्रे, जिल्हा माहिती अधिकारी स्वेता पोटूडे यांची उपस्थिती होती.

 

Post Views: 310
Previous Post

महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील आगारातून जादा प्रवासी बस

Next Post

आर्वी वनपरिक्षेत्रातील लहादेवी क्षेत्रात विष दिल्याने सहा मोरांचा मृत्यु

Next Post
आर्वी वनपरिक्षेत्रातील लहादेवी क्षेत्रात विष दिल्याने सहा मोरांचा मृत्यु

आर्वी वनपरिक्षेत्रातील लहादेवी क्षेत्रात विष दिल्याने सहा मोरांचा मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us