टिम लोकप्रवाह, जळगांव, दि. ०८ – जिल्हयात चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मार्दशन करुन सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावदा व चोपडा शहर पोलीस स्थानकात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरटा व त्याच्या साथीदार यांच्या गुजरात राज्यातील सुरत येथे जावून मुसक्या आवळल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ०६/०३/२०२४ रोजी अक्षय संजय कोळी वय २१ रा. इंदीरानगर प्लॉट भाग अडावद ता. चोपडा जिल्हा जळगांव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन त्याने त्याच्या साथीदारासह सावदा व चोपडा येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याबाबत (०१) सावदा पो. स्टे गुरन ३७/२०२४ भादंवि कलम ४६१ प्रमाणे, (०२) चोपडा शहर पो. स्टे. गुरन ६१३/२०२४ भांदवी कलम ३८०, ३६१ प्रमाणे गुन्हे उघडकीस आले होते. सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी १) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. हातेड बु।। ता. चोपडा जि. जळगांव व त्याचा साथीदार २) सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे वय ३१ रा. सर्वोत्तम हॉटेल, हलदरु रोड, हरेकृष्णा सोसायटी, फ्लॅट नं. २०१, कडोदरा, सुरत (गुजरात) अशांची नावे निष्पन्न करण्यात आले होते.
सदरचे आरोपी सुरत येथे असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त अंमलदार पोहेकाॕ. संदीप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, कमलाकर भालचद्रं बागुल, गोरखनाथ रामभाऊ बागुल, चालक महेश सोमवंशी अशा पोलीस अंमलदाराचे पथक तयार करुन त्यांना सुरत गुजरात येथे पाठवले होते. त्याप्रमाणे वरील पथकाने सुरत येथे जावुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी १) शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. हातेड बु।। ता. चोपडा जि. जळगांव व त्याचा साथीदार २) सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे वय ३१ रा. सर्वोत्तम हॉटेल, हलदरु रोड, हरेकृष्णा सोसायटी, फ्लॅट नं. २०१, कडोदरा, सुरत (गुजरात) यांना सुरत शहरातुन ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुढील तपासकामी सावदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.