Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली – डॉ शिल्पा साळुंखे बोरसे

महिला दिन विशेष कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करतांना

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 9, 2024
in चोपडा, शिक्षण
0
निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली – डॉ शिल्पा साळुंखे बोरसे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ – मुलींमध्ये आरोग्यविषयक जे बदल होतात, ते महिला पालक यांनी विशेषतः समजून घेणे आवश्यक आहे. तसेच आईने आपल्या मुलींची मैत्रीण म्हणून भूमिका पार पाडावी. जेणेकरून मुली सर्व समस्या आईंजवळ सहजतेने बोलतील व त्यातून मुलींच्या समस्या सोडवल्या जातील. यासोबत मुलींना सकस आहार द्यावा, मोबाईल पासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवावे. यातच निरोगी आरोग्य सामावले आहे. आणि निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन गोरगावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा साळुंखे बोरसे यांनी विद्यार्थिनींना समायोजित करतांना केले. त्या चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. सविता जाधव या होत्या. तर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भूपेश सोनवणे हे उपस्थित होते.
उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना डॉ. शिल्पा साळुंखे बोरसे
तर प्रा. डॉ. सविता जाधव यांनी विशेषतः मोठ्या प्रमाणात उपस्थित महिला पालकांशी संवाद साधला.  आपल्या मुलांवर परीक्षेचा ताण येणार नाही, यासाठी पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. याची जाणीव करून दिली. परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येणार नाही यासाठी सहजतेने परीक्षेला सामोरे जावे व स्वीकार करावा असे सांगितले. आणि विद्यार्थिनींशी बोलताना प्रत्येकाने स्वतःला ओळखावे. महिला आणि विद्यार्थी यांना उपदेश करताना सांगितले की, आपल्या मधील स्वतःची जाणीव होणे हे जीवन कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या अंतरंगात झोकून डोकावून स्वतः ला ओळखले पाहिजे. निश्चितच जीवनात यशस्वी होता येईल. यावेळी महिला पालकांनी उत्तम प्रतिसाद या दोन्ही वक्त्यांना दिला.
उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना डॉ. सविता जाधव
यावेळी रंगोस्तव या चित्रकला स्पर्धेत बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्राचे वितरण डॉ. शिल्पा साळुंखे बोरसे व प्रा डॉ. सविता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका सुरेखा कोळी यांनी तर आभार बालवाडी विभागाच्या सुमती पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 363
Previous Post

अट्टल चोरट्याला साथीदारासह सुरत येथुन अटक

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिकांना लाच घेतांना रंगेहात पकडले

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिकांना लाच घेतांना रंगेहात पकडले

जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिकांना लाच घेतांना रंगेहात पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us