टिम लोकप्रवाह, वर्धा दि.१३ – येथील संस्कार नॅशनल स्कूल, नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी, जगदीश श्रीराम पोद्दार फाउंडेशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “ती” प्रत्येक भूमिकेतील “ती” चा सन्मान हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १२ मार्च २०२४ रोजी साई मंदिर, वर्धा येथे आयोजीत करण्यात आला.
याप्रसंगी विभिन्न क्षेत्रातील उंच भरारी घेतलेल्या स्त्री शक्तीला विनम्र अभिवादन करून आणि यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्कार नॅशनल स्कूल, नत्याप्रतिक थिएटर अकॅडमी, वर्धा यांनी विभिन्न शेत्रतील २० महिलांचा सत्कार पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे , रजयोगिनी. माधुरी दीदी, डॉ. पूजा व्यास मिसेस इंडिया इंटनॅशनल २०२२, डॉ. ज्ञानदा फणसे, उषा पोद्दार, डॉ. स्वरुपा चाकोले आदिंची उपस्थिती होती.
यावेळी माधवी चौधरी, साधना सिंघानिया, रीचा व्यास, वृषाली हिवसे, सोनाली कापसे, सारिका मोकादम, शशी राठी, मंजिरी रसपैले, प्रीती पोद्दार, ज्योती भगत, सुनिता सूर्यवंशी, अॕड. शिवानी सुरकार, अॕड. अनिता ठाकरे, डॉ. विभा पटणी, चेतना भुते, जया परमार, खुशबू पांडे, रोनिता मानेकर, संकल्प महिला ग्रुप, वर्धा योग पतंजली ग्रुप आदि कतृत्ववान महिला व त्यांच्या समुहाचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी तर आभारप्रदर्शन विभा भोयर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुराग पोद्दार व प्रतिक सूर्यवंशी यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच विभा भोयर, पूनम बोबडे, साक्षी हिवरे, जान्हवी ठोंबरे, तनुश्री हिवरे, सुविधा झोटींग आदिंनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरगच्च प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.