टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १९ – दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बहार नेचर फाउंडेशन व युवा सामाजिक संघर्ष संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, गुरुदेव अनुसंधान टेकडी, गजानन नगर, वार्ड क्रमांक 01, पिपरी(मेघे), वर्धा येथे सायंकाळी ठीक 7:00 वाजता जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे व बोर व्याघ्र प्रकल्पाचे सेवानिवृत्त वनपाल अशोक भानसे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच सदर कार्यक्रमामध्ये चिमणी व इतर पक्ष्यांकरीता पाणीपात्राचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. पक्षी संवर्धनाच्या या प्रयत्नामध्ये परिसरातील सर्व पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, उपाध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगांवकर, दीपक गुढेकर, सचिव जयंत सबाने, कोषाध्यक्ष राजदीप राठोड, सहसचिव देवर्षी बोबडे, कार्यकारणी सदस्य दर्शन दुधाने, डॉ.आरती प्रांजळे घुसे, घनश्याम माहुरे, पवन दरणे सोबतच मार्गदर्शक प्रा. किशोर वानखडे व अतुल शर्मा यांनी केले आहे.