Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वर्धा लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू, २६ एप्रिल ला होणार मतदान

लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 16, 2024
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
वर्धा लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू, २६ एप्रिल ला होणार मतदान

*आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी
*सोशल मिडिया व फेक न्यूजवर करडी नजर
*भूमिपूजन उद्घाटनावर प्रतिबंध

टिम लोकप्रवाह, वर्धा दि.१६ – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून वर्धा लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. देशभरात ४ जून २०२४ रोजी एकाच दिवशी मतमोजणी होईल. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 8 – वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुक जाहिर झाल्याच्या अनुषंगाने 16 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. कर्डिले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनिल गावीत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसल व उपजिल्हाधिकारी (निवडणुक) अनिल गावित..

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ची घोषणा केली असून आजपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर आयोगाची व जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार असून फेक न्यूज पसरविणाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल कडक कारवाई करेल. नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होतांना काळजी घ्यावी तसेच चुकीचे मेसेज पोस्ट करु नये किंवा फॉरवर्ड करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

 

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी करणे 28 मार्च २०२४,

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल २०२४,

अर्जाची छाननी 5 एप्रिल २०२४,

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8 एप्रिल २०२४,

मतदानाची तारीख 26 एप्रिल २०२४,

मतमोजणीची तारीख ४ जून २०२४,

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख ६ जून २०२४.

 

वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील 44 आर्वी, 45 देवळी, 46 हिंगणघाट, 47 वर्धा व अमरावती जिल्ह्यातील 36 धामणगाव, 43 मोर्शी असे 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात एकूण 10 लाख 89 हजार 718 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 54 हजार 453 असून स्त्री मतदार 5 लाख 35 हजार 255 आहेत व इतर 10 मतदार आहेत.

 

जिल्ह्यात उपलब्ध असलेले EVM-VVPAT (FLC OK) मशिन्सची संख्या- CU-1772, BU-3242, VVPAT-1882 आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रांची संख्या 1997 आहे. या निवडणुकीत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत अवैध रक्कम, दारु, प्रतिबंधीत औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकी संदर्भात होणाऱ्या जप्तीबाबत Election Seisure Management System (ESMS) प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली असून यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट मतदान सुविधेसाठी 85 वर्षावरील नागरिक तसेच दिव्यांगासाठी त्यांच्याकडून फॉर्म नं-12 डी नमूना बीएलओ मार्फत भरुन घेण्यात येणार आहे. निवडणुक कालावधीत प्रसारमाध्यमांनी पेड न्यूज बाबत आयोगाच्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदान हा एक उत्सव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post Views: 484
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्य महिला मेळावा संपन्न

Next Post

बहार नेचर फाउंडेशन व युवा सामाजिक संघर्ष संघटना करणार जागतिक चिमणी दिवस साजरा

Next Post
बहार नेचर फाउंडेशन व युवा सामाजिक संघर्ष संघटना करणार जागतिक चिमणी दिवस साजरा

बहार नेचर फाउंडेशन व युवा सामाजिक संघर्ष संघटना करणार जागतिक चिमणी दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us