टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. २८ : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार आज गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत उपस्थित होते. यावेळी श्री. कर्डिले म्हणाले की, 08 वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सेवाग्राम रोड, सिव्हील लाईन्स वर्धा येथे दिनांक 28 मार्च 2024 पासून 4 एप्रिल 2024 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी नामनिर्देशन पत्र मिळतील व स्वीकारले जातील.
नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृह, वर्धा येथे करण्यात येईल. उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक 8 एप्रिल 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मतदान दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.