Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शहरात मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 27, 2024
in चोपडा, शासकीय
0
चोपडा शहरात मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २७ :  येथील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने चोपडा शहरातील मतदान केंद्रांची सद्यस्थिती आणि तेथील मूलभूत व्यवस्था आदींची पाहणी नुकतीच संपन्न झाली. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जळगाव गजेंद्र पाटोळे, चोपडा तालुक्याचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात, चोपडा नगरपरिषदेचे परीक्षाविधीन मुख्याधिकारी अर्पित चौहान, चोपडा मंडळाधिकारी मनोज साळुंखे आदी उपस्थित होते.
प्रताप विद्या मंदिर येथील मतदान केंद्राची पाहणी करतांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी अर्पित चौहान व इतर…

चोपडा शहरातील विविध प्रभागांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांमध्ये आदर्श आराखड्यानुसार लाईट, पंखा, पाणी व प्रसाधनगृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री त्यांनी यावेळी केली. मतदान केंद्र पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी याप्रसंगी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांनी दिले.
 प्रताप विद्या मंदिर, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, मुस्तफा अँग्लो ऊर्दु हायस्कुल, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय आदिंसह इतर शाळेतील मतदान केंद्रांची प्राथमिक पाहणी संपन्न झाली.
तसेच पाहणी दरम्यान विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी अधिकारी वर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. भविष्यातील सुजाण जबाबदार नागरिक विद्यार्थ्यांमधूनच घडणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Post Views: 552
Previous Post

चोपड्यात बाल आनापान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज

Next Post
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us