Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुक्यात “आशा दिन” उत्साहात साजरा

सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्काराचे वितरण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 28, 2024
in आरोग्य, चोपडा, शासकीय
0
चोपडा तालुक्यात “आशा दिन” उत्साहात साजरा
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २८ – सर्वसामान्य नागरिक व आरोग्य विभाग या दोघांमधील महत्वाचा दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी जनसामान्यांना दिलेल्या आरोग्यसेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिनांक २७ जानेवारी रोजी चोपडा नगरपरिषदेच्या नाट्यगृहात आशा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी रमेश वाघ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित करतांना गट विकास आधिकारी रमेश वाघ, सोबत उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर..
              चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत 225 ग्रामीण, शहरी भागातील 33 व 14 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या  आरोग्यसेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे त्याबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी नगरपालिका नाट्यगृह चोपडा येथे आशा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी रमेश वाघ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी केले.
याप्रसंगी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये अडावद येथील शोभा प्रवीण गायकवाड, चहार्डी येथील मीना युवराज पाटील, धानोरा येथील हपशान अरमान तडवी, गोरगावले येथील शीतल शरद पाटील गोरगावले, हातेड येथील हेमलता महेंद्रसिंग राजपूत, लासुर येथील दिपाली सुनील ढिवरे, वैजापूर येथील सुरमी बुधा पावरा व चोपडा नगरपालिका क्षेत्रातून हिना अयाज पिंजारी आदि आशा स्वयंसेविकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी आशांनी काढलेल्या रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा, व्दितीय क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र, चहार्डी, तर तृतीय क्रमांक शहरी आरोग्य केंद्र, चोपडा शहर यांना देवून गौरविण्यात आले.
गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात आशा स्वयंसेविकांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आशांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच ”होय मी मतदान करणार” अशी सर्व आशा स्वयंसेविकांबाबत प्रतिज्ञा घेतली.
          तसेच तालुक्याचे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक किशोर सैंदाणे यांनी क्षयरोग दिनानिमित्त आशांनी केलेल्या कामगिरीबद्दल मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विस्तार अधिकारी सुशील सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर सैंदाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश बाविस्कर, जितेंद्र मोरे, प्रमोद पाटील, दिलावरसिंग वळवी, कमलेश बडगुजर, किशोर सैंदाणे, राजु पवार, गजानन करंदीकर, तालुका समूह संघटक सागर शिंपी, जयश्री तायडे व ज्योती सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.
Post Views: 568
Previous Post

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज

Next Post

चारचाकी गाडीचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; जळगांव एलसीबीची कारवाई

Next Post
चारचाकी गाडीचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; जळगांव एलसीबीची कारवाई

चारचाकी गाडीचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; जळगांव एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us