टिम लोकप्रवाह, जळगांव दि. २८ – येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांना दिनांक २७/०३/२०२३ गोपनीय माहिती मिळाली की, अमळनेर शहरातील मनिष उर्फ सनी महाजन हा त्याचे साथिदार यांचे सोबत मारुती सुझकी कंपनीच्या इको गाडीचे सायलन्सर चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करणेबाबत किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोहेकॉ. संदिप पाटील, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील आदिंच्या पथकास रवाना करुन पुढील कारवाई करणेबाबत आदेश दिले.
त्यावरून वर नमुद पथकाने अमळनेर शहरात जावून मिळलेल्या बातमीप्रमाणे मनिष उर्फ सनी महाजन याची माहिती काढून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन, रा. शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर असे सांगीतले. त्यावेळी त्यास मिळालेल्या बातमीची विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांने त्याचे सोबत साथीदार २) शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील, रा. राजाराम नगर अमळनेर, ३) निखील संतोष चौधरी, रा. राजाराम नगर अमळनेर अश्यांचे नाव सांगीतल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी त्यांचा अजुन एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी, रा.रामेश्वर कॉलनी अमळनेर असा असून तो सध्या नाशिक जेलमध्ये असल्याचे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी अमळनेर पो.स्टे. चे 1) CCTNS NO 578/2022, IPC 379, 2) CCTNS NO 591/2022, IPC 379, 3) CCTNS NO 47/2023 IPC 379, 4) CCTNS NO 135/2023, IPC 379, 5) CCTNS NO 504/2023 IPC 379 या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच आरोपी १) मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन, रा.शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर याचे कडून १ चोरीची मोटार सायकल मिळाली असून सदर मोटार सायकल बाबत तपास केला असता त्याबाबत नाशिक जिल्ह्यातील आडगाव पो.स्टे. ला गुन्हा दाखल असलेबाबत माहिती मिळाली आहे. तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासकामी अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर सुनिल नंदवालकर यांचे मार्गदर्शनाखाली व जळगाव स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. संदिप पाटील, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील आदिंच्या पथकाने केली.