टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ : अखेर झालेल्या घडामोडीत वर्धा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आर्वी विधानसभेचे माजी आमदार अमर काळे यांची वर्णी लागली. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर वर्धा लोकसभेची निवडणुक लढणार आहे. याकरीता दि. ०२ एप्रिल रोजी नामांकन दाखल करणेकामी भव्य रॕली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री आमदार रणजीत कांबळे, विरेंद्र जगताप, सुरेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, अॕड. चारुलता टोकस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, शिवसेना उबाठा गट जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिरापूरकर, आप चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड आदिंसह इतर महाविकास आघाडी व इंडिया अलायंसच्या इतर पदाधिकार्यांचा समावेश होता. यावेळी तब्बल १५ ते २० हजाराचा जनसमुदायाची उपस्थिती होती.
देशात सध्या अघोषित आणीबाणी दिसून येत असून सत्तेचा गैरवापर होत आहे, अशी जळजळीत टीका शरद पवार यांनी दि. २ रोजी वर्धा येथे सरकारवर केली. वर्धा येथील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने आयोजीत रॅलीपूर्वी आयोजित सभेत ते बोलत होते.
आपली लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. आपल्याकडे पैसा नाही पण लोक ही आपली ताकद आहे. हुकूमशाही आणि दडपशाहीचे विरुद्ध लोकशाही अशी ही निवडणूक आहे संविधान वाचविण्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाची असल्याचे अमर काळे यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी रॅलीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे पदाधिकारी, नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून रॅलीची सुरूवात झाली. शहरातील विविध मार्गांनी रॅलीने मार्गक्रमण केले. रॅलीदरम्यान खुल्या वाहन सजवून त्यामध्ये नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये खुद्द शरद पवार सहभागी होते. त्यांनतर शरद पवार यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. त्यांनतर शरद पवार यांनी सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली.
सदर रॕलीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त बजाविण्यात आला.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...