Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गांधी जिल्ह्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचे काम पवारांनी केलं – फडणवीस                

फडणवीसांच्या उपस्थितीत रामदास तडस यांचा उमदेवारी अर्ज दाखल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 4, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, वर्धा जिल्हा, विदर्भ
0
गांधी जिल्ह्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचे काम पवारांनी केलं – फडणवीस                
नामाकंन अर्ज दाखल करतांना रामदास तडस व सोबत नेतेमंडळी
टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ – वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा आणि काँग्रेसचा गड म्हणून संपूर्ण नावलौकिक असतांना याच जिल्ह्यातुन काँग्रेसला हद्दपार करण्याचे काम शरद पवारांनी केले. जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे स्वप्न होते. साकार करण्याचे काम मात्र पवारांनी केलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी टीका फडणवीस यांनी रामदास तडस यांचे लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजीत सभेस केली. यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, उमेदवार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, प्रताप अडसड, पंकज भोयर, अशोक उईके, रामदास आंबटकर, राष्ट्रवादीचे सूबोध मोहिते, सरिता गाखरे, गणेश ईखार, अशोक शिंदे, आशिष देशमुख, सुनील गफाट, सुधीर दिवे, सुमित वानखेडे, विजय आगलावे, सुरेश वाघमारे, राजेश बकाने, परिमल कांबळे व ईश्वर बाळबुद्धे आदिंची उपस्थिती होती.
सभेत मार्गदर्शन करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसमुक्त नारा आम्ही दिला जिल्हापरिषद, नगरपरिषद, आमदारकी आम्ही जिंकलो, पण वर्धेतून ‘पंजा’ गायब करता आला नाही परंतु पवार साहेबांनी गांधी जिल्ह्यातून ते करून दाखविलले. जे आमचे स्वप्नं होते ते पवारांनी पूर्ण केले. महात्मा गांधींच्या नावाने इतके वर्ष राजकारण केले. त्याच पावन भूमीतून काँग्रेसला उमेदवार सापडेना, ही फार लाजिरवाणी बाब आहे. आयात केलेल्या उमदेवाराचा टिकाव विधानसभेत लागत नसल्यामुळे किमान लोकसभेत शहीद होऊन नाव मोठे करावे, अशा मनीषेतून अर्ज दाखल केला की काय? अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी यावेळी केली. विरोधकांच्या रेल्वे गाडीला इंजन नसल्यामुळे व आपल्याकडे विकासरुपी इंजन असल्यामुळे मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही, राजकीय पटलावर यावेळी ४०० आकडा झळकणार आहे. रामदास तडस हे लोकसभेत नक्कीच हट्रिक करणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Post Views: 380
Previous Post

सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांचा आवाज दाबला जातोय – शरद पवार

Next Post

माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

Next Post
माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

माजी सरपंच उमेश लटारे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us