टिम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली) दि. ०४ – शहरातील मुख्य डाकघर शेजारील शेतकरी महिला निधी बॅंकेतून तेथील खातेदारांना पैसेच दिले जात नसल्याने अखेर खातेदारांनी जिल्हाधिकारी व पोलीस विभागाला तक्रार सादर केली आहे. शेतकरी महिला निधी बॅंकेत मंगळवारी सुमारे 50 हून अधिक खातेदार त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे काढण्यासाठी गेलेत. पण बॅंकेतील अधिका-यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. परिणामी संतप्त खातेदारांनी बॅंकेच्या अधिका-यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र बॅंक अधिका-यांकडून कुठलेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे संंतप्त खातेदारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
अन्.. बंद केला विद्युत पुरवठा !
पैसे काढण्यासाठी आलेल्या संतप्त खातेदारांकडून पैसे केव्हा मिळतील ? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर काही वेळाने बॅंकेचे अधिका-यांनी बॅंकेतून पळ काढला. तर नंतर बॅंकेचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर संतप्त खातेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.
येथे खातेदारांनी त्यांची समस्या जिल्हा प्रशासनातील अधिका-यांसमोर मांडली. संबंधित बॅंकेत काहीतरी गौडबंगाल झाल्यामुळेच आम्हाला आमचेच पैसे दिले जात नसल्याचा, आरोप यावेळी खातेदारांनी केला. जास्त व्याज मिळेल असे आमिष देत शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांकडून मोठी गुंतवणूक या बँकेत करून घेण्यात आली. पण सध्या खातेदारांना त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारीतून खातेदारांनी केला आहे.
माझ्या प्रमाणेच अनेकांनी विश्वास ठेऊन संबंधित बॅंकेत खाते उघडत पैसे जमा केले आहे. दैनिक ठेवच्या माध्यमातून एजन्ट द्वारे आमचे पैसे बॅंकेत जमाही झाले आहेत. परंतु, मुदत संपूष्टात आली असली तरी पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...