टीम लोकप्रवाह, वर्धा (सचिन ओली ) दि. 06– येथील लोकसभेचे खासदार व महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची स्नुषा पूजा पंकज तडस (शेंद्रे) यांनी त्यांचे सासरे विद्यमान खासदार रामदास तडस यांचे विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करीत एकप्रकारे खळबळ उडवून दिली. यावेळी बोलतांना त्यांनी सासऱ्या विरुद्ध आपला रोष व्यक्त केला. याप्रसंगी त्यांचे लहान बाळ सुद्धा त्यांचे सोबत होते हे विशेष!
याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलतांना पूजा तडस त्यांनी स्पष्ट केले की, गेले कित्येक वर्ष रामदास तडस हे वर्धा लोकसभेचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र यांनी आपली सून व सख्या नातवाला देखील न्याय दिला नाही तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय देतील? अशी खंत व्यक्त केली. एकीकडे महिला सशक्तीकरणा बाबत बोलायचं मात्र कृती शून्य अशी गत झाली आहे असे म्हणत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखविला. एकंदरीत या सर्व प्रकाराने आता वर्धा लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सून असा सामना वर्धेकरांना बघायला मिळणार आहे.