टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०८ – दरवर्षीप्रमाणे यंदाही जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेंशट हेल्प सेंटर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवाराला राशन किटचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर, शेख जलीस अहेमद, डॉ. नवाज शाह, मुराद खान शिकलगर, मोहसीन अहेमद, शफीक शाह, गुलाम नबी मिस्त्री, मोईन पेंटर, हाफिज मलीक आदिंची उपस्थिती होती.
कँसर पेंशट हेल्प सेन्टर आणि जन मानवता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर स्वतः कँसरग्रस्त असून कँसरवर यशस्वीपणे मात केल्यानंतर त्यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यांनी महिन्यातून 12 दिवस या अभियानासाठी राखीव ठेवले आहे. व्यसनमुक्ती, तंबाखू गुटखा विरोधी अभियानात व कॅन्सर जनजागृती अभियानात त्यांचे उत्तर महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य आहे.
जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेंशट हेल्प सेंटर गेल्या 12 वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यामधे कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दिवाळी व रमजान या सणाला मोफत राशन किटचे वाटप, कॅन्सरग्रस्त परिवारातील मुलींच्या लग्नकार्यात मदत, उपचारासाठी मदत व मार्गदर्शन तसेच कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती व व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती जन मानवता बहुउद्देशीय संस्थेला आर्थिक मदद आणि अमूल्य मार्गदर्शन करतात.
Post Views: 422