टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १६ – रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा अनुसूचित जमाती विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 319 मतदान केंद्रे असून त्यापैकी 50 टक्के मतदान केंद्रांची निवडणुकीच्या दिवशी थेट वेब कास्टिंग होणार आहे. 50 टक्के मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सचिन बांबळे हे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी पाटोळे यांनी माहिती देताना सांगितले की, चोपडा विधानसभा मतदार क्षेत्र अंतर्गत तीन लाख 19 हजार 397 मतदारांची संख्या आहे. यात एक लाख 63 हजार 521 पुरुष मतदार तर एक लाख 55 हजार 873 महिला मतदारांची संख्या असून तीन मतदार हे तृतीयपंथी आहेत.
319 मतदान केंद्रांपैकी 54 मतदान केंद्र हे शहरात असून 265 मतदान केंद्र हे ग्रामीण भागात आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संपूर्ण चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. या चोपडा विधानसभा मतदार क्षेत्र लगत शिरपूर, सेंधवा, रावेर, अमळनेर, जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाची सीमा आहे. सीमावर्ती गावात तीन ठिकाणी सत्रासेन, वैजापूर आणि उमर्टी या गावांमध्ये चेक पोस्ट निर्माण केलेले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात ज्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल होईल. त्या दिवसापासून 24 तास या चेक पोस्टवर एक पथक कार्यरत असणार आहे. 24 तास वाहनांची तपासणी होईल. अवैध वाहतूक आढळली तर त्या वाहनांवर आणि वाहनचालकांवर कारवाई होणार आहे. तसेच लोकेशननुसार यावल तालुक्यात 67 मतदान केंद्र तर चोपडा शहरात 21 मतदान केंद्र निवडण्यात आलेली आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेली चोपडा शहरातील मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय आणि चहार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पाच पेक्षा जास्त मतदान केंद्रांची रचना आहे. ज्या मतदान केंद्रांवर नेटवर्क मिळत नाही असे 9 मतदान केंद्र आहेत. त्यात देव्हारी, देवझिरी, लंगडाआंबा, उस्मळी जामण्या गाडऱ्या, आंबापाणी, बोरमळी, रुईखेडा या मतदान केंद्रांचा समावेश आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा शहर पोलीस स्टेशन, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन, अडावद पोलीस स्टेशन आणि यावल पोलीस स्टेशन असे चार पोलीस स्टेशनचा समावेश आहे.
319 मतदान केंद्रांवर मतदान पथकांना घेऊन जाण्यासाठी 96 मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. त्यासाठी 30 बस, सात मिनीबस आणि 59 जीप गाड्या तर सेक्टर अधिकाऱ्यांसाठी 38 जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आचारसंहिता कालावधी अंतर्गत तीन फिरते पथकांची, तीन एसएसटी पथके, तीन व्हिडिओ सर्वे करणारे पथके तयार करण्यात आलेले आहेत. चोपडा विधानसभा क्षेत्रांतर्गत 382 मतदान मशीन आणि कंट्रोल आणि व्हिव्हि पॅट मशीन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये सर्व ईव्हीएम मशीन येऊन त्या ठिकाणी खडा पहारा ठेवण्यात आला आहे, सीसीटीव्ही कॅमेरे अंतर्गत या स्ट्रॉंग रूमवर पहारा ठेवलेला आहे. मतपत्रिका अंतिम झाल्यानंतर या सर्व मतदान मशीनवर या पत्रिका चिकटवण्यात येणार आहेत. एकूण चोपडा विधानसभा क्षेत्रांतर्गत मतदान कर्मचाऱ्यांची संख्या 4,085 एवढी आहे. वेळोवेळी या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणी करण्यासाठी ट्रेनिंग देऊन 135 प्रश्नांची प्रश्नावली भरून, 30 प्रश्नांची प्रश्नावली भरून 75 टक्के मार्कांची अट ठेवून जे कर्मचारी 75 टक्के पेक्षा कमी मार्क मिळवत आहेत त्यांना पुन्हा पुन्हा प्रशिक्षित करून पुन्हा परीक्षा देऊन त्यांच्या शंका दूर करण्यात येत आहेत. यासाठी मास्टर ट्रेनर्स आणि सेक्टर अधिकारी कार्यरत आहेत.
स्वीप ऍक्टिव्हिटी
लोकसभा निवडणुकीवेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, विविध स्पर्धां चेणायोजन, रॅली, धावण्याची स्पर्धा, सायकल रॅली या स्पर्धा राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन म्हातारे मतदार, व तरुण आणि युवक मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. महिला मतदारांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चोपडा विधानसभा क्षेत्रांतर्गत एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची ही श्री पाटोळे यांनी सांगितले.
मतदानासाठी विशेष बूथ –
चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत दोन केंद्र हे विशेष केंद्र म्हणून तयार करण्यात आलेले आहेत. त्यात एक महिलांसाठी केंद्र आहे. या केंद्रावर सर्व महिला कर्मचारीच कार्यरत असणार आहेत. तर दुसरे केंद्र हे दिव्यांग बांधवांसाठी आहे. या केंद्रांवरही सर्व मतदान अधिकारी हे दिव्यांगच कार्यरत असणार आहेत.
85 वर्षा वयापेक्षा जास्त मतदारांच्या घरी जाऊन होणार मतदान –
ज्या मतदारांचे वय 85 वर्षे पेक्षा जास्त आहे व अंथरुणाला खीळून आहेत अशा मतदारांचे ही मतदान व्हावे यासाठी मतदान पथक स्थापन करण्यात आलेले आहेत. या प्रकारचे 75 मतदारांची नोंदणी झालेली असून या 75 मतदारांच्या घरी वाहनांची व्यवस्था करून त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन पथक मतदान पत्रिकेवर मतदान करून घेणार आहेत. आणि ज्यांची नोंदणी यात झालेली नाही परंतु व अंथरुणावर खीळून आहेत अशा मतदारांसाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...